Ashok Kharat Case: भोंदू खरातला 'सिद्धपुरुष' म्हणाला, पतसंस्थेतून ब्लॅकचा पैसा व्हाईट केला? कोण आलं पोलिसांच्या रडारवर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा एकेक दुवा आता पोलिसांच्या हाती लागत आहे.
अहिल्यानगर: महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा एकेक दुवा आता पोलिसांच्या हाती लागत आहे. अशोकख खरातचा ब्लॅकचा पैसा हा पतसंस्थांच्या माध्यमातून व्हाईट झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बोगस खातेदारांच्या खात्यांतून आर्थिक व्यवहार झाला आहे. सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरातशी संबंधित खाती आहेत. या पतसंस्थेचा संस्थापक नामकर्ण आवारे आता शिर्डी पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचे मुख्य केंद्र हीच पतसंस्था असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
एकाच पतसंस्थेत ३२ खाती!
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. नामकर्ण आवारे याच्या जगदंब पतसंस्थेत अशोक खरातची तब्बल ३२ बँक खाती असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांमधून गेल्या काही काळात कोट्यवधी रुपयांची संशयास्पद देवाण-घेवाण झाली आहे. भोंदूगिरीतून जमा केलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा तो लपवण्यासाठी या खात्यांचा वापर केला गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
advertisement
'सिद्धपुरुष' म्हणणारा आवारे रडारवर
अशोक खरात हा कोणी साधा माणूस नसून तो एक 'सिद्धपुरुष' आहे, असा प्रचार नामकर्ण आवारे लोकांमध्ये करत असे. खरातच्या भोंदूगिरीला दैवी स्वरूप देऊन भाविकांची फसवणूक करण्यात आवारेचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. आवारेने आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून खरातला आर्थिक सुरक्षा पुरवली होती का? आणि या व्यवहारांमध्ये इतर कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत का? याचा शोध आता शिर्डी पोलीस घेत आहेत.
advertisement
मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश होणार?
नामकर्ण आवारेची कसून चौकशी सुरू असून पतसंस्थेचे सर्व व्यवहार पोलीस तपासून पाहत आहेत. ३२ खात्यांमधील ट्रान्झॅक्शन कोणाकोणाशी झाले, हे समोर आल्यास या प्रकरणात नाशिक आणि सिन्नरमधील अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे. या तपासात खरातच्या बेनामी संपत्तीचे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: भोंदू खरातला 'सिद्धपुरुष' म्हणाला, पतसंस्थेतून ब्लॅकचा पैसा व्हाईट केला? कोण आलं पोलिसांच्या रडारवर







