PSL मध्ये राडा! मोईन अलीच्या अंगावर का धावून गेला? डेव्हिड वॉर्नरने सांगितलं खरं कारण? Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PSL 2026 David Warner Moeen Ali Fight : वॉर्नर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कराची किंग्सचा कॅप्टन असलेल्या डेव्हिड वॉर्नरचे आपल्याच टीममधील सहकारी मोईन अली याच्यासोबत कडाक्याचे भांडण झाल्याचे समोर आले आहे.
PSL 2026 David Warner Moeen Ali Video : पाकिस्तानची स्वस्त आयपीएल म्हणजेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक वाद झाल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या हंगामात पाकिस्तान सुपर लीगमध्ये बॉल टेम्परिंगपासून वादग्रस्त निर्णयापर्यंत अनेक वाद पहायला मिळाले आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडच्या मोईन अलीमध्ये वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यावर डेव्हिड वॉर्नरने झालेली खरी घटना सांगितली.
वॉर्नर रागात काहीतरी बोलला
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी ऑलराउंडर मोईन अली हे दोघंही पीएसएल 2026 मध्ये कराची किंग्सकडून खेळत आहेत. बुधवारी कराची आणि पिंडीज यांच्यात या सिझनमधील 10 वा मुकाबला पार पडला. ही मॅच संपल्यानंतर वॉर्नर आणि मोईन यांच्यात अचानक वातावरण तापलं. वॉर्नर प्रचंड रागात काहीतरी बोलताना दिसत होता, अखेर टीममधील एका सदस्याने मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याचे पाहायला मिळालं.
advertisement
I said to @HaiderAzhar to go first and shake hands https://t.co/tiTbSjZIyG
— David Warner (@davidwarner31) April 2, 2026
कोणतंही भांडण झालं नाही -वॉर्नर
पण डेव्हिड वॉर्नरने हा वाद झालेला व्हिडीओ फेटाळून लावला असून असं कोणतंही भांडण झालं नाही, असं म्हटलं आहे. मी हैदर अझहरला आधी जाऊन हँडशेक करायला सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया डेव्हिड वॉर्नरने या व्हिडीओवर दिली आहे. तसेच आमची मस्करी चालू होती, असंही अझहरने यावेळी सांगितलं. सोशल मीडियावर त्याने याबाबत पोस्ट केली आहे.
advertisement
198 रनचे मोठे टार्गेट
दरम्यान, लाहौरच्या गडाफी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये कराची किंग्सने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पिंडीजने प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 197 रन उभारले होते. पिंडीजसाठी डॅरिल मिचेलने सर्वाधिक 65 रनची खेळी केली, तर कराचीसाठी हसन अलीने सर्वात जास्त तीन विकेट्स घेतल्या. 198 रनचे मोठे टार्गेट समोर असतानाही कराचीच्या बॅटर्सनी दमदार कामगिरी केली.
advertisement
आझम खानची 74 रनची तुफानी खेळी
दरम्यान, कराची किंग्सने हे लक्ष्य 19.2 ओव्हरमध्ये यशस्वीरित्या गाठले. आझम खानने 74 रनची तुफानी खेळी केली, तर कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने 50 रन बनवून विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयानंतर आनंद साजरा करण्याऐवजी वॉर्नर आणि मोईन अली यांच्यात झालेला हा कथित वाद आता चर्चेचा विषय ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 12:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL मध्ये राडा! मोईन अलीच्या अंगावर का धावून गेला? डेव्हिड वॉर्नरने सांगितलं खरं कारण? Video








