advertisement

क्षणभराचा राग अन् आयुष्यभराची मिळाली जखम, पुण्यात महिलेनं डोळ्यादेखत गमावला काळजाचा तुकडा

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात एक मन हेलवणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेला घरगुती वादातून आलेल्या रागाची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.

manchar news
manchar news
सचिन तोडकर, प्रतिनिधी मंचर: पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात एक मन हेलवणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेला घरगुती वादातून आलेल्या रागाची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. तिने नवऱ्याशी वाद झाल्यानंतर आपल्या पाच वर्षांच्या मुलासह विवाहित उडी मारली. या घटनेत मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. महिला मात्र थोडक्यात बचावली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह मंचर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पाण्यात पडल्यावर आईने पाईप धरला, पण मुलगा हरपला

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर शहरातील हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) यांचा घरात वाद झाला होता. या वादातून आलेल्या निराशेपोटी त्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पाच वर्षांचा मुलगा नेहांत आशिष बाणखेले याला सोबत घेत घराजवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.
विहिरीत पडल्यानंतर मृत्यू डोळ्यासमोर दिसताच हर्षदा यांनी विहिरीतील एका पाईपला घट्ट धरून ठेवले आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र, याच वेळी त्यांचा चिमुरडा नेहांत हा पाण्याच्या प्रवाहात बुडाला. पाच वर्षांच्या निरागस मुलाला सावरता आलं नाही आणि त्याचा करुण अंत झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. हर्षदा यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र नेहांतचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर अशा भीषण शोकांतिकेत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. स्वतःच्या आईच्या हातूनच मुलाचा जीव गेल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत. घरातील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला होता? हर्षदा यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं होतं का? या सर्व बाजूंचा तपास आता पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
क्षणभराचा राग अन् आयुष्यभराची मिळाली जखम, पुण्यात महिलेनं डोळ्यादेखत गमावला काळजाचा तुकडा
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement