advertisement

लग्नात मृदुंगाचे सूर, पण खरं आयुष्य भेसूर; ‘ते’ कांड पाहिलं अन् पत्नीचं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: मृदुंगाचार्य म्हणून अमोल लघाणे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून, त्याच्या प्रबोधनपर व्हिडिओंमुळे लोक त्याला आदर्श मानत होते.

लग्नात मृदुंगाचे सूर, पण खरं आयुष्य भेसूर; ‘ते’ कांड पाहिलं अन् पत्नीचं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगर हादरलं!
लग्नात मृदुंगाचे सूर, पण खरं आयुष्य भेसूर; ‘ते’ कांड पाहिलं अन् पत्नीचं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगर हादरलं!
छत्रपती संभाजीनगर : समाजाला संस्कारांचे धडे देणाऱ्या सोशल मीडिया स्टारचा खऱ्या आयुष्यातील भयानक चेहरा पुढे आला आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे एका विवाहितेने पतीच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमागे पतीच्या अनैतिक संबंधांचा संशय आणि त्यातून झालेला मानसिक-शारीरिक छळ असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी पती अमोल बाबासाहेब लघाणे हा मृदुंगाचार्य म्हणून ओळखला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल आणि अमोल यांचा विवाह 25 मार्च 2025 रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नाच्या दिवशी स्वतः मृदंग वाजवत अमोलने मंडपात केलेला प्रवेश सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार अगदी सुरेल वाटावा असा होता. पण काळ जसजसा पुढे सरकला, तसतसा या नात्यातील सूर विस्कटू लागला आणि आनंदी आयुष्याला दु:खाची छाया पडू लागली.
advertisement
पत्नीला संशय
काजलच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, अमोलचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध असल्याचा संशय काजलला होता. पत्नी म्हणून तिने याबाबत विचारणा केली असता, तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अमोलने संतापाचा मार्ग निवडला. तिला मारहाण करणे, मानसिक छळ करणे आणि "माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केलास तर घराबाहेर काढीन" अशा धमक्या देणे, हे तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले होते. अवघ्या नऊ महिन्यांच्या संसारात काजलने सहन केलेला मानसिक ताण आणि वेदना तिच्यासाठी असह्य ठरल्या.
advertisement
लोका सांगे ब्रह्मज्ञान...
दरम्यान, अमोल लघाणे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून, त्याच्या प्रबोधनपर व्हिडिओंमुळे लोक त्याला आदर्श मानत होते. मात्र, ज्या व्यक्तीने समाजाला नीतीमूल्यांचे धडे दिले, त्याच्यावरच अशा प्रकारचे आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. काजलने आपल्या संसारासाठी शेवटपर्यंत झगडण्याचा प्रयत्न केला, पण पतीच्या वागणुकीमुळे तिची स्वप्नेच कोसळली.
वेदनादायक शेवट
1 एप्रिल रोजी या संघर्षाचा शेवट अत्यंत वेदनादायक झाला. काजलने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती समोर आली. तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अमोल लघाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
लग्नात मृदुंगाचे सूर, पण खरं आयुष्य भेसूर; ‘ते’ कांड पाहिलं अन् पत्नीचं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगर हादरलं!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement