advertisement

Railway : नाशिकरोड-कल्याण लोकल प्रवास स्वप्नच राहणार?,'या' कारणामुळे प्रवाशांचा हिरमोड

Last Updated:

Nashik Road- Kalyan Local Update : कल्याण-नाशिक ते नाशिक-कल्याण दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. नक्की प्रवास अधिक सोपा होईल किंवा प्रवासात अडचणी वाढणार आहेत त्याबाबत माहिती समोर आलेली आहे.

नाशिकरोड-कल्याण लोकल प्रवास सध्यातरी अशक्य
नाशिकरोड-कल्याण लोकल प्रवास सध्यातरी अशक्य
कल्याण : गेल्या काही महिन्यांमहिन्यापासून नाशिकरोड ते कल्याणदरम्यान लोकल प्रकल्पाची चर्चा सुरु होती. मात्र आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे स्वप्न भंगले आहे.
नाशिककरांचा लोकल प्रवास का रखडला?
नाशिकरोड ते कल्याण या मार्गावर आधीचा अनेक उपनगरीय गाड्या सुरु आहे. मात्र या दरम्यान लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीवर आता केंद्र सरकाने एका टोलवाटोलवी केली आहे. ज्यात कसारा-इगतपूरी या घाटाची रुंदी कमी आहे आणि लोकल गाड्यांची रुंदी जास्त या कारणामुळे ही सेवा शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. शिवाय मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक, पायाभूत सुविधा आणि देखभाल व्यवस्थेवर हा मार्ग अवलंबून आहे.
advertisement
खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकरोड ते कल्याण या लोकल रेल्वे सेवेबाबात लोकसभेत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला आणि रेल्वे मंत्रालयाला याबाबत अनेक प्रश्न केले. पण मंत्रालयाने उत्तर दिले की ही सेवा तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकरांच्या पदरी निराशा पडली आहे. खरं पाहिलं तर नाशिकरोड ते कल्याण ही सेवा विद्यार्थी, शेतकरी तसे लघु व्यापारी आणि रोजंगारी करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची होती.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway : नाशिकरोड-कल्याण लोकल प्रवास स्वप्नच राहणार?,'या' कारणामुळे प्रवाशांचा हिरमोड
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement