advertisement

सोलापूर ते हैदराबाद अवघ्या 55 मिनिटांत, गोव्यासाठी खास विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?

Last Updated:

Solapur Hyderabad Flight: सोलापूर ते हैदराबाद दरम्यान विमानसेवा सुरू होणार असून ही सेवा गोवा–सोलापूर–हैदराबाद अशा मार्गाने चालविण्यात येणार आहे.

सोलापूर ते हैदराबाद अवघ्या 55 मिनिटांत, गोव्यासाठी खास विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
सोलापूर ते हैदराबाद अवघ्या 55 मिनिटांत, गोव्यासाठी खास विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
सोलापूर - सोलापूरकरांसाठी खूशखबर असून आता गोवा आणि हैदराबाद थेट हवाईसेवा सुरू झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोलापूर ते हैदराबाद दरम्यान विमानसेवा सुरू होणार असून ही सेवा गोवा–सोलापूर–हैदराबाद अशा मार्गाने चालविण्यात येणार आहे. फ्लाय 91 कंपनीकडून ही सेवा सुरू केली जाणार असून 17 एप्रिलपासून प्रत्यक्ष उड्डाणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्या विमान सेवेमुळे सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. सोलापूरहून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 55 मिनिटांत विमान हैदराबाद विमानतळावर पोहोचणार आहे.
हवाई उड्डाणाचे वेळापत्रक
नियोजित वेळापत्रकानुसार फ्लाय 91 चे विमान दुपारी 1:45 वाजता गोव्याहून उड्डाण घेऊन सुमारे 3 वाजता सोलापूर विमानतळावर येईल. येथे 20 ते 25 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर तेच विमान दुपारी 4:25 वाजता हैदराबाद येथे लँड होईल.
advertisement
अल्प विश्रांतीनंतर विमान पुन्हा सोलापूरमार्गे गोव्याकडे रवाना होणार आहे. हैदराबादहून निघाल्यानंतर सायंकाळी 5:50 वाजता विमान सोलापूरला पोहोचेल आणि 6:10 वाजता गोव्याकडे उड्डाण घेऊन सुमारे 7 वाजता गोवा येथे पोहोचेल.
तिकीट बुकिंग कधी?
दरम्यान, या सेवेसाठी तिकीट बुकिंगबाबत उत्सुकता वाढली आहे. 2 एप्रिलपासून बुकिंग सुरू होणार असल्याची चर्चा होती, मात्र अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनुसार 3 किंवा 4 एप्रिलपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूर ते हैदराबाद अवघ्या 55 मिनिटांत, गोव्यासाठी खास विमानसेवा, पहिलं उड्डाण कधी?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement