Crime : सरकारी नोकरीची 'भयंकर' किंमत; तरुणांनी गमावलं सर्वस्व; मुरबाडमध्ये नेमकं घडलं काय?
Last Updated:
Murbad News : मुरबाडमध्ये सरकारी नोकरीचे आमिष तरुणांसोबत भयंकर घटना घडली आहे.हा प्रकार नोकरी न मिळाल्याने प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुरबाड : सरकारी नोकरी आपल्याकडे असावी असं प्रत्येक तरुणांसह त्यांच्या पालकांचेही स्वप्न असंत. पण मुरबाडमध्ये हेच स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना यात निराशा मिळाली असून यांना एका भयंकर प्रकाराला सामोरे जावे लागले आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून मोठी फसवणूक झाली आहे. या प्रकरणात तब्बल 10 बेरोजगार तरुणांकडून तब्बल 53 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आलेले आहे. सध्या मुरबाड पोलिसांनी या प्रकरणात अनिल भांगले याला अटक केलेली आहे.
कसे फसले आमिषाच्या जाळ्यात?
तक्रारदार केशव देऊ देसले(वय54) यांची आरोपीशी साधारण 2023 मध्ये एका कार्यक्रमात ओखळ झाली. नंतर ही ओळख वाढली आणि आरोपी भांगले याने स्वत:चे सरकारी कार्यालयात संपर्क असल्याचे सांगितले. त्यात त्याने तक्रार यांच्या मुलाला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासने दिले. त्यासाठी याने तब्बल 8 लाख रुपयांची मागणी केली.
advertisement
देसले यांनीही मुलाच्या भविष्याचा विचार करुन आरोपीला वेळोवेळी पैसे दिले. यात फक्त देसले नाही तर काही बेरोजगार तरुणांनाही अशाच पद्धतीने फसवण्यात आले. यातील एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीने सर्व तरुणांना दिल्लीला नेले आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या बनावट लेटरहेडवर नियुक्तीपत्रे आणि प्रशिक्षणपत्रे दिली.
यानंतर सर्वांचा विश्वास बसावा यासाठी आरोपीने या तरुणांना नोएडा येथे 45 दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले. प्रशिक्षण मिळाल्यानंतर बरेच दिवस झाले पण नोकरी मिळाली नसल्याने आरोपी भांगलेवर संशय आला आणि देसले यांनी कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा सर्व कागदपत्रांवरील सही आणि शिक्के बनवाट असल्याचे समोर आले.
advertisement
या फसवणुकीत सुनील भांगेल यांच्याकडून 13 लाख तर रमेश गायकर यांच्याकडून 8 लाख, गोपाळ वाघ यांच्याकडून 7 लाख आणि राजाराम मेंगाळ यांच्याकडून 7 लाख घेतल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणानंतर मुरबाडमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आता ओरापीला अटक केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 1:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Crime : सरकारी नोकरीची 'भयंकर' किंमत; तरुणांनी गमावलं सर्वस्व; मुरबाडमध्ये नेमकं घडलं काय?








