advertisement

Ashok Kharat Case: हळदीला शर्ट काढायला नकार दिला पण अखेर खरातचं गुपित फुटलं, ३० वर्षांनी सासुरवाडीच्या लोकांनी काय सांगितलं?

Last Updated:

Ashok Kharat : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अडकलेल्या भोंदू अशोक खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत.

हळदीला शर्ट काढायला नकार दिला पण अखेर खरातचं गुपित फुटलं, ३० वर्षांनी सासुरवाडीच्या लोकांनी काय सांगितलं?
हळदीला शर्ट काढायला नकार दिला पण अखेर खरातचं गुपित फुटलं, ३० वर्षांनी सासुरवाडीच्या लोकांनी काय सांगितलं?
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अडकलेल्या भोंदू अशोक खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून दुसरीकडे त्याच्या फरार पत्नीचा शोध घेतला जात आहे. अशोक खरातचे आर्थिक गैरव्यवहारही तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. तर, अशोक खरातच्या कृत्यावर त्याच्या सासुरवाडीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी त्याच्या लग्नातील घटना सांगितले आहेत.
सिन्नर तालुक्यातील पाडळी या जेमतेम १७०० लोकसंख्येच्या गावात खरातची सासुरवाडी असून, त्याच्या लग्नावेळचा एक अंगावर काटा आणणारा किस्सा आता समोर आला आहे. खरातच्या अटकेनंतर या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केलेला संताप आणि दिलेली माहिती तपासाला वेगळी दिशा ठरणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

लग्नाच्या हळदीला कपडे काढायला दिला होता नकार!

advertisement
१९९२-९३ च्या सुमारास अशोक खरातचा विवाह पाडळी येथील कल्पनाशी झाला. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, खरातचे वय जास्त असल्याने सुरुवातीला या लग्नाला घरच्यांचा आणि भावाचा तीव्र विरोध होता. तरीही हे लग्न कसे जमले, याचे गूढ आजही कायम आहे. मात्र, लग्नाच्या वेळी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना खरातने अंगावरचे कपडे काढायला स्पष्ट नकार दिला होता. उपस्थितांनी आग्रह धरल्यानंतर जेव्हा त्याने कपडे काढले, तेव्हा त्याच्या अंगावर शस्त्राने झालेल्या जखमांचे वार स्पष्टपणे दिसत होते. हा प्रकार पाहून तेव्हा लग्नातील पाहुणेही चक्रावले होते.
advertisement

गावाच्या नावाचा लागला कलंक

पाडळी गावाला केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वारसा लाभलेला आहे. ज्या गावाचे नाव देशाच्या राजकारणात आदराने घेतले जाते, त्या गावाचे नाव या भोंदू बाबाच्या कृत्यामुळे खराब झाल्याची भावना ग्रामस्थांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना व्यक्त केली आहे. "अशोक खरातच्या अशा वागण्यामुळे सासुरवाडी आणि नातेवाईकही बदनाम झाले आहेत. आता त्याच्याबद्दल बोलण्यासारखे काहीच उरले नाही," अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
advertisement

फरार पत्नीचा शोध सुरू

दरम्यान, अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत असला, तरी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. सिन्नर आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या या भागात एसआयटी (SIT) पथक कसून शोध घेत आहे. खरातच्या अंगावरील ते जुने जखमेचे वार नेमके कशाचे होते? त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काही संबंध होता का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: हळदीला शर्ट काढायला नकार दिला पण अखेर खरातचं गुपित फुटलं, ३० वर्षांनी सासुरवाडीच्या लोकांनी काय सांगितलं?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement