Ashok Kharat Case : फरार कल्पना खरातच्या माहेरी पोहोचताच SIT चक्रावली! अशोक खरातचं १६ वर्षांचं 'ते' गुपित आलं समोर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिष, भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिष, भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे तपासादरम्यान महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे. एसआयटीकडून खरातच्या मुलाची चौकशी सुरू आहे. तर, खरातची पत्नी कल्पना पसार झाली आहे. तिच्या नावाने लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. कल्पनाच्या माहेरी तिच्या बद्दल आणि अशोक बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लुकआऊट नोटीस जारी
कल्पना खरात गेल्या दोन दिवसांपासून फरार असून तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. ती परदेशात पळून जाऊ नये किंवा राज्याबाहेर हालचाली करू नये यासाठी एसआयटीने तिच्या विरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली आहे. खरात कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकांचीही आता चौकशी सुरू झाली असून, लवकरच या प्रकरणातील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
advertisement
माहेरच्यांशी संपर्क तोडला
भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर 'एसआयटी' (SIT) पथकाने आता आपला मोर्चा फरार संशयित कल्पना खरात हिच्या माहेरी वळवला आहे. मात्र, सिन्नर तालुक्यातील पाडली येथे पोहोचलेल्या तपास पथकासमोर जे सत्य आले, त्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
अशोक खरात हा पत्नी कल्पनाला तिच्या माहेरी भेटायला येऊ देत नव्हता. लग्नानंतर कल्पनाने आपल्या भावांशी आणि आई-वडिलांशी सर्व संबंध तोडले होते. "ती कधीही आम्हाला भेटायला आली नाही आणि अशोक खरातनेही तिला येऊ दिले नाही," अशी हतबलता तिच्या नातेवाईकांनी एसआयटीसमोर व्यक्त केली. कल्पनाचे माहेरचे लोक अत्यंत साध्या परिस्थितीत असून ते तुटपुंज्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
कल्पना खरातकडून शेतकऱ्याची फसवणूक...
शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा ठपका कल्पना खरातवर ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना 'एसआयटी'ने (SIT) आता आपला फास अधिक आवळला असून, कल्पना आणि अशोक खरात यांचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तपासात केवळ पती-पत्नीच नव्हे, तर कल्पनाच्या दोन भावांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. जमीन व्यवहाराच्या आर्थिक उलाढालीत कल्पना खरात आणि तिच्या भावांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे तपासात उघड झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ खरात दांपत्यापुरते मर्यादित न राहता, त्यांचे नातेवाईकही एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 9:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case : फरार कल्पना खरातच्या माहेरी पोहोचताच SIT चक्रावली! अशोक खरातचं १६ वर्षांचं 'ते' गुपित आलं समोर









