advertisement

Sanjiv Goenka : दिसतं तर नसतं...! गोयंकांनी ऋषभ पंत झापलं? LSG ने शेअर केला इनसाईड Video, दृष्यम 2 सारखा रिक्रिएट सीन?

Last Updated:

Sanjiv Goenka Rishabh Pant Chat Video : खरं काय घडलं ते क्षण येथे आहेत, असं म्हणत लखनऊने ऋषभ पंत आणि गोयंका यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

LSG on Sanjiv Goenka Rishabh Pant Chat
LSG on Sanjiv Goenka Rishabh Pant Chat
LSG on Sanjiv Goenka Rishabh Pant Chat : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएन्ट्स यांच्यात आयपीएलचा पाचवा सामना खेळवला गेला होता. रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीने लखनऊचा पराभव केला अन् दोन अंक खिशात घातले. अशातच आता या मॅचनंतर मैदानात असं काही घडलं की लखनऊ सुपर जाएन्ट्सचे मालक संजीव गोयंका पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

संजीव गोयंका यांची ऋषभ पंतसोबत चर्चा

आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून संघाचा पराभव झाल्यानंतर, संजीव गोयंका हे कर्णधार ऋषभ पंत आणि संघाच्या सपोर्ट स्टाफशी मैदानावरच चर्चा करताना दिसून आले. या घटनेची तुलना गोयंकांच्या के.एल. राहुलसोबतच्या पूर्वीच्या वर्तनाशी करण्यास चाहत्यांनी जराही विलंब लावला नाही.
advertisement

लखनऊने थेट उत्तर दिलं

IPL 2024 च्या हंगामात गोयंका यांनी केएल राहुलला झापलं होतं. गोयंकाने राहुलसोबत नको असं गैरवर्तन केलं होतं आणि याच प्रकरणामुळे पुढे जाऊन त्या भारतीय क्रिकेटपटूला या फ्रँचायझीपासून वेगळे व्हावं लागलं होतं. आता ऋषभ पंतच्या बाबतीतही तसाच प्रसंग घडताना पाहून, चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ या दोघांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता लखनऊने यावर थेट उत्तर दिलंय.
advertisement

संभाषणाचा व्हिडीओ शेअर

तुम्ही जे काही पाहता, ते सर्वच काही खरे वास्तव नसतं. कॅमेरे बंद झाल्यावर सामन्यानंतरचे ते 'बिनधास्त' आणि खरं काय घडलं ते क्षण येथे आहेत, असं म्हणत लखनऊने ऋषभ पंत आणि गोयंका यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघंही हसून एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत. अशातच आता नेटकऱ्यांनी याच व्हिडीओवरून लखनऊची शाळा घेतली आहे.
advertisement

सर्व प्रकार संशयास्पद?

advertisement
दरम्यान, संजीव गोयंका यांनी व्हिडीओ शेअर करून आपली पाप धुण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं वाद झाला होता, तिथं गर्दी दिसत होती. पण या व्हिडीओमध्ये लोकांची गर्दी दिसत नाहीये, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असल्याचे अनेक चाहत्यांचे मत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तुलना आता चक्क 'दृश्यम 2' (Drishayam 2) या चित्रपटातील दृश्यांशी केली जात आहे. रिषभ पंतला पुन्हा बोलावून हा सीन 'रिक्रिएट' करण्यात आल्याचा दावा काही जण करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanjiv Goenka : दिसतं तर नसतं...! गोयंकांनी ऋषभ पंत झापलं? LSG ने शेअर केला इनसाईड Video, दृष्यम 2 सारखा रिक्रिएट सीन?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement