advertisement

ज्याला देत होते नकार, त्यानेच बनवलं साऊथचा 'देव'; 15 महिने थिएटरमध्ये तंबू ठोकून होता रजनीकांतचा हा सिनेमा

Last Updated:
Rajinikanth Film : अभिनेते रजनीकांत यांचा तो सिनेमा ज्याला ते आधी नकार देत होते. पण त्याच सिनेमाने त्यांना साऊथचा देव बनवलं. कोणता होता तो सिनेमा?
1/7
कलाकारांच्या बाबतीत अनेकदा असं होतं की ज्याला ते नकार देण्याच्या विचारात असतात ती कलाकृती त्यांना अजरामर बनवते. सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबरही असंच काहीसं झालं. रजीनकांत ज्या सिनेमाला नकार देण्याच्या विचारत होते त्याच सिनेमाने त्यांना साऊथ सिनेमाचा देव बनवलं.  कोणता होता तो सिनेमा? 

2/7
दिग्दर्शक सुरेश कृष्णा यांचा हा गँगस्टर ड्रामा स्वीकारण्यास रजनीकांत सुरुवातीला कचरत होते. 'डॉन'ची भूमिका साकारणे हे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी धोकादायक ठरू शकते असे त्यांना वाटत होते. तरीही त्यांनी तो चित्रपट केला आणि तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. असं म्हणतात की याच सिनेमानं रजनी यांना 'दक्षिणेचा देव' बनवलं.

3/7
या सिनेमानं रजनीकांत यांना अशा स्टारडमच्या शिखरावर पोहोचवले, जे आजही कायम आहे. हा सिनेमा तब्बल 15 महिने  ( 450 दिवसांहून अधिक ) थिएटरमध्ये तंबू ठोकून होता. 

4/7
दिग्दर्शक सुरेश कृष्णा जेव्हा या सिनेमासाठी रजनीकांतकडे गेले तेव्हा  रजनीकांत यांचा 'अण्णामलाई' हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता आणि त्यांना भीती होती की जर हा सिनेमा चालला नाही तर त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. 'अण्णामलाई'मुळे मिळालेल्या आपल्या 'सामान्य माणूस' या प्रतिमेत ते खूप रमले होते आणि त्यामुळेच 'डॉन'ची भूमिका स्वीकारण्यास ते कचरत होते.

5/7
रजनीकांत यांचा तो सिनेमा म्हणजेच 'बाशा'. सुरेश कृष्णा यांनी पुढे स्पष्ट केले की, पटकथा अधिक चांगली होती, पण आम्ही रजनीकांतने मिळवलेल्या सुपरस्टारपदाचा वापर करून 'बाशा'ला आणखी मोठ्या उंचीवर नेले. 

6/7
'बाशा'ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यातील सस्पेन्स आणि दुहेरी आयुष्य. एकीकडे 'मणिकम' नावाचा एक साधा ऑटोचालक आहे. जो आपल्या बहिणीचे लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या शांतपणे सांभाळतो. दुसरीकडे त्याचा धोकादायक भूतकाळ आहे. 'मणिकम बाशा'. चित्रपटातील ज्या दृश्यात मणिकमची खरी ओळख उघड होते आणि तो गुंडांना चोप देतो.

7/7
12 जानेवारी 1995 रोजी 'बाशा' हा सिनेमा रिलीज झाला. केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे तर देशभरात गाजला. मदुराई आणि चेन्नईसारख्या शहरांमधील विविध चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सहजपणे 175 दिवस (रौप्य महोत्सवी) चालला. तर मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहांमध्ये तो 15 महिने चालला. असे म्हटले जाते की या चित्रपटाच्या यशानंतर रजनीकांत यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांना 'सुपरस्टार' पेक्षा 'भगवान' (दक्षिण सिनेमाचे देव) मानले जाऊ लागले. लोक त्यांच्या प्रतिमेची पूजा करू लागले आणि त्यांची प्रत्येक शैली 'धर्म' म्हणून स्वीकारू लागले.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement