advertisement

SRH vs KKR : नेमकी चूक कुणाची? कॅमरून ग्रीन की अंगकृष रघुवंशी? ICC च्या एका नियमामुळे केकेआरचे बुडाले 25 कोटी!

Last Updated:

SRH vs KKR Cameroon Green Run Out Controversy : अंगकृष रघुवंशी याने शॉट मारून रन घेण्याचा कॉल दिला खरा पण त्याला रन आऊट होईपर्यंत कॅमरून ग्रीनला क्रॉस करता आलं नाही. त्यामुळे कॅमरून ग्रीनला रनआऊट दिलं गेलं.

SRH vs KKR Cameroon Green Run Out Controversy
SRH vs KKR Cameroon Green Run Out Controversy
SRH vs KKR, Cameroon Green Run Out : कॅप्टन ईशान किशनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 65 धावांनी विजय मिळवला. केकेआरने हाताने दोन चुका केल्या, ज्यामुळे त्यांना मॅच गमावावी लागली. यामध्ये 25 कोटीचा प्लेयर कॅमरून ग्रीनची विकेट गेमचेंजर ठरली. याच कॅमरून ग्रीनच्या विकेटवरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. कॅमरून ग्रीन अंगकृष रघुवंशीच्या चुकीमुळे रनआऊट झाला. यानंतर क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

पावरप्लेच्या शेवटच्या बॉलवर घोडचूक

सनरायझर्स हैदराबादने 227 धावांचा डोंगर उभारल्यानंतर हैदराबादला विजयासाठी आक्रमक कामगिरीची गरज होती. फिन अॅलन याने त्याच अंदाजात आक्रमण सुरू केलं. पण रहाणेने अँकर रोल निभावला. पण रहाणे आऊट झाल्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यावर मोठी जबाबदारी होती. पण पावरप्लेच्या शेवटच्या बॉलवर घोडचूक झाली. अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यात संवादाची कमतरता जाणवली अन् ग्रीन रन आऊट झाला. पण चूक कुणाची होती?
advertisement

कॅमरून ग्रीनला आऊट दिलं गेलं

पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अंगकृष रघुवंशी याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. त्यावेळी बॉल इशान मलिंगाच्या हातात गेला. तर अंगकृष रघुवंशी याने धाव घेण्याचा कॉल घेतला अन् कॅमरून ग्रीन नॉन स्ट्राईक एन्डवरून धावत सुटला. पण कॉल चुकीचा गेल्याने अंगकृष रघुवंशी काहीसा गडबडला अन् रन आऊट झाला. अंगकृष रघुवंशी मैदानातून बाहेर जात असताना अंपायरने त्याला थांबवलं अन् कॅमरून ग्रीनला आऊट दिलं. पण अंगकृष रघुवंशी नॉन स्ट्राईकला पोहोचला नाही अन् ग्रीनला आऊट का दिलं? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आयसीसीचा एक नियम कारणीभूत ठरला.
advertisement
advertisement

ICC चा नियम काय सांगतो?

दरम्यान, अंगकृष रघुवंशी याने शॉट मारून रन घेण्याचा कॉल दिला खरा पण त्याला रन आऊट होईपर्यंत कॅमरून ग्रीनला क्रॉस करता आलं नाही. त्यामुळे कॅमरून ग्रीनला रनआऊट दिलं गेलं. आयसीसीच्या नियमानुसार, दोन्ही खेळाडू धावत असतील अन् त्यांनी जर धाव घेताना एकमेकांना क्रॉस केलं नाही, तर त्या बाजूला रनआऊट झालाय, त्या बाजूचा खेळाडू आऊट असतो. याच नियमाला धरून कॅमरून ग्रीन याला आऊट दिलं गेलं अन् केकेआरचे 25 कोटी बुडाले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs KKR : नेमकी चूक कुणाची? कॅमरून ग्रीन की अंगकृष रघुवंशी? ICC च्या एका नियमामुळे केकेआरचे बुडाले 25 कोटी!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement