advertisement

बाळाला वाचवण्यासाठी आई धावली, पण त्यांनी औषध नव्हे विषच दिलं, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Kalyan News : कल्याणमध्ये नुकताच समोर आलेल्या प्रकारामुळे सर्वजणांचा संताप होऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली जात आहे. जिथं अवघ्या दहा महिन्यांच्या बाळासोबत असं काही घडतं, नेमके हे प्रकरण काय आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे बाळाला एक्सपायर औषध देण्याचा प्रकार उघड
रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे बाळाला एक्सपायर औषध देण्याचा प्रकार उघड
कल्याण : राज्यात गेल्या काही दिवसांत निकृष्ट औषधांचा मुद्दा वारंवार चर्चेत येत असून पुन्हा आता आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. हे सध्या समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेतून समोर आलेले आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला मुदत संपलेले औषध देण्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दहा महिन्यांच्या बाळाच्या आयुष्याशी खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या ग्रामीण भागातील एक महिला तिच्या दहा महिन्यांच्या बाळाला वारंवार ताप आणि अंगावर पुरळ येत होते. त्यामुळे बाळावर उपचार घेण्यासाठी ती गोवेली ग्रामीण रुग्णालयात गेली होती. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केल्यानंतर औषधं लिहून दिली. त्यानंतर बाळाला रुग्णालयातून एक औषध देण्यात आले.
नेमकं हे कसं समोर आलं?
धक्कादायक गोष्ट म्हणजे बाळाला दिलेली हे औषधा फेब्रुवारी 2026 मध्येच एक्सपायर झालेले होते. ही गोष्ट एका सामाजिक कार्यकर्तीच्या लक्षात आली. फक्त आणि फक्त तिच्या सतर्कतेमुळे हे औषधं बाळाला देण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला.
advertisement
या घडलेल्या प्रकरणाची दखल घेत ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. तसेच दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
बाळाला वाचवण्यासाठी आई धावली, पण त्यांनी औषध नव्हे विषच दिलं, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement