Konkan Railway : दादरला विसरा,आता हे स्थानक गाठा; रत्नागिरी पॅसेजरच्या वेळापत्रकात आणि स्थानकात मोठा बदल
Last Updated:
Dadar Ratnagiri Passenger Train Update : दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आता दादर स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकातून सुटणार आहे. मार्गिकांवरील कामामुळे हा बदल करण्यात आला असून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : कोकणात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आता मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरुन सुटणार नाही तर नव्या स्थानकातूनच तिची सेवा सुरु राहणार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नेमकं आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता नेमके कोणते स्थानक गाठावे लागणार आहे याबाबत अधिक जाणून घ्या.
दादर स्टेशनवरून रत्नागिरी गाडी गायब?
कोकणात जाणाऱ्या प्रवांशाना आता दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पकडण्यासाठी आता दिवा स्थानकात जावे लागणार आहे. कारण कुर्ला-सीएएसमएची दरम्यान असलेली पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा ही दादर स्थानकातून सुटणार आहे असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी सांगितले
लोकल सेवेवर परिणाम होणार?
रत्नागिरी पॅसेंजर ही ट्रेन दिवा स्थानकाच्या उपनगरीय मर्गावरुन जात असताना चार रुळांचे क्रॉसिंग करावे लागत होते, त्यामुळे सात ते आठ लोकल थांबवाव्या लागत होत्या. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून ही ट्रेन दिवा स्थानकावरुनच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान दादर-गोरखपूर ट्रेन इगतपुरी मार्गे जात असल्याने दिव्यावरुन या मार्गे जाणाऱ्या ट्रेनचा इतर कोणत्याही ट्रेनवर परिणाम होणार नाही .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 8:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway : दादरला विसरा,आता हे स्थानक गाठा; रत्नागिरी पॅसेजरच्या वेळापत्रकात आणि स्थानकात मोठा बदल






