advertisement

Donald Trump Tarriff: युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, भारताला मोठा धक्का, कोणावर लागला १०० टक्के कर?

Last Updated:

Donald Trump : एका बाजूला अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू असताना आता दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब फोडला आहे.

युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब,  भारताला मोठा धक्का, कोणावर लागला १०० टक्के कर?
युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, भारताला मोठा धक्का, कोणावर लागला १०० टक्के कर?
वॉशिंग्टन: एका बाजूला अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू असताना आता दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आक्रमक 'अमेरिका फर्स्ट' धोरणांतर्गत जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोठा परिणाम भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी विदेशी ब्रँडेड औषधांवर थेट १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या धातूंवरील करात कपात करून उद्योगांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

फार्मा कंपन्यांना अल्टिमेटम

ट्रम्प यांच्या नवीन आदेशानुसार, ज्या फार्मा कंपन्या आपली औषधे अमेरिकेबाहेर तयार करतात, त्यांना आता दुप्पट कर भरावा लागणार आहे. कंपन्यांना केवळ औषधांच्या किमती कमी कराव्या लागणार नाहीत, तर त्यांचे उत्पादनही अमेरिकेतच करावे लागेल. ज्या कंपन्या या अटींचे पालन करणार नाहीत, त्यांना १०० टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल. मात्र, जे अंशत: उत्पादन अमेरिकेत हलवतील, त्यांच्यासाठी हा कर २० टक्के असेल. युरोपीय संघ, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मित्र राष्ट्रांसाठी ही मर्यादा १५ टक्के ठेवण्यात आली आहे.
advertisement

मेटल्स क्षेत्राला 'बूस्टर डोस'

औषध क्षेत्रावर कडक निर्बंध लादतानाच, ट्रम्प यांनी स्टील, ॲल्युमिनियम आणि तांब्यावरील शुल्कात मोठी कपात केली आहे. अनेक मेटल उत्पादनांवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून २५ टक्केपर्यंत खाली आणले आहेत. विशेष म्हणजे, ज्या उत्पादनांमध्ये धातूचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना करातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांना स्वस्त कच्चा माल उपलब्ध होणार आहे.
advertisement

जुनी चूक सुधारण्याचा प्रयत्न?

हा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचे कायदेशीर कारण असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी 'लिबरेशन डे' अंतर्गत लावलेले जागतिक टॅरिफ सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले होते. यामुळे सरकारला सुमारे १६६ अब्ज डॉलर्सचा परतावा द्यावा लागणार आहे. या मोठ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि आपली व्यापार नीती पुन्हा लागू करण्यासाठी ट्रम्प यांनी हे नवीन नियम आणले आहेत.
advertisement

अंमलबजावणीचा कालावधी

मोठ्या फार्मा कंपन्यांना हे नियम लागू करण्यासाठी १२० दिवसांचा, तर लहान कंपन्यांना १८० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, औषधांच्या किमती वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Donald Trump Tarriff: युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, भारताला मोठा धक्का, कोणावर लागला १०० टक्के कर?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement