खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड, टॅबमध्ये आढळले 200 अश्लील VIDEO, बडा बिझनेसमन अडकला जाळ्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. याबाबतचे १०० हून अधिक अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. आता नाशिकमधून आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. याबाबतचे १०० हून अधिक अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. ही घटना ताजी असताना आता नाशिकमधून आणखी एक मोठं कांड उघडकीस आलं आहे. नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाचे दीडशे ते दोनशे व्हिडीओ समोर आले आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
तर हे प्रकरण ब्लॅकमेलिंगचं असल्याचं समोर येत आहे. चार आरोपी एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होते. त्याचे एका मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला ब्लॅकमेल केलं जात होतं. मात्र दहा हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या टॅबमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे खासगी व्हिडीओ आढळले आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी केला होता. या टॅबमधील सर्व डेटा मिळवत, आरोपींनी व्यावसायिकाचे मैत्रिणीसोबत असलेले अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी व्यावसायिकाने संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मोबाइलवर फोन आला. 'मला ७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये द्या व तुमचा टॅब घेऊन जा', असे संशयित बोलला. व्यावसायिकाने कार्यालयात जाऊन खात्री केली असता टॅब चोरण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चोरट्याकडून टॅबमधील जुन्या मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये खंडणी म्हणून घेतले गेले. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करून ४ जणांना ताब्यात घेतले.
advertisement
टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडिओ
सातपूर पोलिसांनी काही वेळातच संशयित आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तक्रारदारावरही संशय व्यक्त करण्यात येत असून, मोठे सेक्स स्कँडल उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 9:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड, टॅबमध्ये आढळले 200 अश्लील VIDEO, बडा बिझनेसमन अडकला जाळ्यात









