advertisement

दिसायला सामान्य, आत 'मृत्यूचं जाळं'! पुण्यात पोर्टर ॲप वापरून 300 हून अधिकांना पाठवलं 'ते' पार्सल; चौघांना अटक

Last Updated:

आरोपी ड्रग्जची लहान पाकिटे तयार करून ती एखाद्या सामान्य वस्तूच्या पार्सलप्रमाणे पॅक करत असत. या पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी पोर्टर ॲपवरून डिलिव्हरी बॉय बोलावला जायचा.

300  हून अधिक ग्राहकांना पाठवलं 'ते' पार्सल (प्रतिकात्मक फोटो)
300 हून अधिक ग्राहकांना पाठवलं 'ते' पार्सल (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातील वारजे आणि उत्तमनगर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हायटेक ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे आरोपी कोणालाही संशय येऊ नये म्हणून 'पोर्टर' या प्रसिद्ध डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जचा पुरवठा करत होते. या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार सुनील राठोड याच्यासह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अशी होती पद्धत
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. आरोपी ड्रग्जची लहान पाकिटे तयार करून ती एखाद्या सामान्य वस्तूच्या पार्सलप्रमाणे पॅक करत असत. या पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी पोर्टर ॲपवरून डिलिव्हरी बॉय बोलावला जायचा. डिलिव्हरी बॉयला आत काय आहे याची कल्पना नसल्याने हे 'पार्सल' सुरक्षितपणे ग्राहकापर्यंत पोहोचत असे. ग्राहकांकडून ड्रग्जची ऑर्डर ऑनलाइन घेतली जात होती आणि व्यवहारही डिजिटल माध्यमांतून होत होते.
advertisement
300 हून अधिक ग्राहक पोलिसांच्या रडारवर
आरोपींच्या चौकशीत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना ड्रग्ज पुरवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे शहरात इतरत्र कुठे पसरले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
"आरोपींनी डिलिव्हरी ॲपचा गैरवापर करून ड्रग्ज पोहोचवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या चौकशीतून इतर पुरवठादार आणि मोठ्या रॅकेटची माहिती मिळण्याची शक्यता असून, तपास अधिक सखोलपणे सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) संभाजी कदम यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दिसायला सामान्य, आत 'मृत्यूचं जाळं'! पुण्यात पोर्टर ॲप वापरून 300 हून अधिकांना पाठवलं 'ते' पार्सल; चौघांना अटक
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement