advertisement

अंजली दमानियांचे गंभीर आरोप, चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल, एकनाथ शिंदेंसोबतही झालं बोलणं

Last Updated:

मागील वर्षभरात अशोक खरातने कुणाला कॉल केले? त्याला कुणी कॉल केले? तो कुणाशी किती वेळा आणि किती काळ बोलला? याचा सगळा तपशील समोर आला आहे. यात विविध राजकीय नेत्यांची नावं समोर आली आहेत.

अशोक खरातला रुपाली चाकणकर यांचे १७७ कॉल
अशोक खरातला रुपाली चाकणकर यांचे १७७ कॉल
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता अशोक खरातचा सीडीआर समोर आला आहे. मागील वर्षभरात अशोक खरातने कुणाला कॉल केले? त्याला कुणी कॉल केले? तो कुणाशी किती वेळा आणि किती काळ बोलला? याचा सगळा तपशील समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने अशोक खरातचा हा सीडीआर पाठवला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत खरातला कॉल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाचा खुलासा केला आहे.
अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार, मागील वर्षभरात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केला आहे. अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिच्यानंतर सर्वाधिक कॉल हे रुपाली चाकणकर यांनी केल्याचं सीडीआरमधून स्पष्ट होत आहे. दोघांमध्ये तब्बल ३३,७२७ सेकंद बोलणं झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. हेच मिनिटांमध्ये सांगायचं झालं तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी मागील वर्षभरात तब्बल ९ तास ३६ मिनिटं एकमेकांशी संवाद केला आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीने देखील अशोक खरातला तब्बल २३६ वेळा कॉल केला आहे.
advertisement
रुपाली चाकणकर यांच्याव्यतिरिक्त इतरही राजकीय नेत्यांनी अशोक खरातला संपर्क साधल्याचं सीडीआरमधून समोर आलं आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलार यांनी देखील अशोक खरातशी संपर्क साधला आहे. मागील वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला १७ कॉल केले होते. यात १० कॉल इनकमिंग तर ७ कॉल आऊट गोइंग होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
advertisement
दुसरीकडे, चंद्रकांत पाटील ८ वेळा, सुनील तटकरे ८ वेळा आणि आशिष शेलार यांनी एक वेळा अशोक खरातशी संपर्क साधला आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. अशोक खरातचा हा कथित सीडीआर समोर आल्यामुळे आता या प्रकरणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडीओ जारी करत सीडीआरबाबत विविध दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यावर अद्याप संबंधित नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंजली दमानियांचे गंभीर आरोप, चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल, एकनाथ शिंदेंसोबतही झालं बोलणं
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement