advertisement

वर्षभर कष्ट करून उसाचं बिल वेळेवर मिळत नव्हतं, शेतकऱ्यानं निर्णय घेतला, आता एकरात साडेतीन लाखांची कमाई

Last Updated:
शेतकरी मळसिद्ध कोकळगी यांनी पारंपरिक शेतीला पर्याय शोधला आहे. त्यांनी शेतामध्ये फुले मधुरा हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्वारीच्या वाणाची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
1/5
शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उच्चशिक्षित शेतकरी मळसिद्ध कोकळगी यांनी पारंपरिक शेतीला पर्याय शोधला आहे. त्यांनी शेतामध्ये फुले मधुरा हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्वारीच्या वाणाची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.

2/5
मळसिद्ध कोकळगी यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे. शेतामध्ये ते पारंपरिक पद्धतीने ऊस आणि मका पिकांची लागवड करत होते. मात्र उसाचे बिल वेळेवर न मिळणे, तसेच मक्यावर होणारे रोग आणि दरातील चढ-उतार यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून मार्गदर्शन घेतले आणि फुले मधुरा या हुरड्याच्या वाणाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

3/5
या पिकातून पहिल्याच वर्षी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. लागवडीसाठी एकरी सुमारे 25 ते 30 हजार रुपये खर्च आला. चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत खर्च वजा करून त्यांना एकरी सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यांनी तयार केलेला हुरडा सुमारे 400 रुपये प्रति किलो दराने विकला गेला.

4/5
मळसिद्ध कोकळगी सध्या तीन ते चार वर्षांपासून ते सातत्याने तीन एकर क्षेत्रात फुले मधुरा हुरड्याची लागवड करत आहेत. यामध्ये त्यांना एकरी खर्च वजा करून चार ते पाच महिन्यांत एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळत आहे.

5/5
पारंपरिक पिकांऐवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आधुनिक वाणांची निवड करावी. त्यामुळे शेतीत निश्चितच चांगला नफा मिळू शकतो, असा संदेश शेतकरी मळसिद्ध कोकळगी यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement