अशोक खरातचा CDR अंजली दमानियांच्या हाती, कोणत्या नेत्याशी किती वेळा झालं बोलणं? शेअर केली यादी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचे सगळे राजकीय कनेक्शन्स उघड झाले आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचे सगळे राजकीय कनेक्शन्स उघड झाले आहेत. मागील वर्षभरात अशोक खरात कुणाच्या संपर्कात होता. त्याचा कोणत्या राजकीय नेत्यांशी संवाद व्हायचा? याचा सगळा तपशील समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबतचा खुलासा केला आहे. अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर दमानिया यांच्या हाती लागला आहे. त्यांनी खरातशी संवाद साधणाऱ्या राजकीय नेत्यांची सगळी यादीच समोर आणली आहे.
अंजली दमानिया यांनी आरोप काय केले?
अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार, मागील वर्षभरात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केला आहे. अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिच्यानंतर सर्वाधिक कॉल हे रुपाली चाकणकर यांनी केल्याचं सीडीआरमधून स्पष्ट होत आहे. दोघांमध्ये तब्बल ३३,७२७ सेकंद बोलणं झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. हेच मिनिटांमध्ये सांगायचं झालं तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी मागील वर्षभरात तब्बल ९ तास ३६ मिनिटं एकमेकांशी संवाद केला आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीने देखील अशोक खरातला तब्बल २३६ वेळा कॉल केला आहे.
advertisement
कोणत्या नेत्याशी किती वेळा बोलणं झालं?
रुपाली चाकणकर यांच्याव्यतिरिक्त इतरही राजकीय नेत्यांनी अशोक खरातला संपर्क साधल्याचं सीडीआरमधून समोर आलं आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलार यांनी देखील अशोक खरातशी संपर्क साधला आहे. मागील वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला १७ कॉल केले होते. यात १० कॉल इनकमिंग तर ७ कॉल आऊट गोइंग होते. दोघांमध्ये सर्वात मोठा कॉल २१ मिनिटांचा होता, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
advertisement
दुसरीकडे, चंद्रकांत पाटील ८ वेळा, सुनील तटकरे ८ वेळा आणि आशिष शेलार यांनी एक वेळा अशोक खरातशी संपर्क साधला आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. अशोक खरातचा हा कथित सीडीआर समोर आल्यामुळे आता या प्रकरणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडीओ जारी करत सीडीआरबाबत विविध दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यावर अद्याप संबंधित नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातचा CDR अंजली दमानियांच्या हाती, कोणत्या नेत्याशी किती वेळा झालं बोलणं? शेअर केली यादी









