Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा संकट, हवामानात विचित्र बदल, 24 तासांसाठी यलो अलर्ट!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारींचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीच्या मध्यावर सातत्याने बदल जाणवत आहेत. राज्यात 16 फेब्रुवारी 2026 रोजी स्थिर आणि कोरडे हवामान राहील. तसेच बहुतांश भागांत आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील आणि दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढेल. काही ठिकाणी सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवेल, मात्र दिवस पुढे जाईल तसा उन्हाचा चटका वाढेल. महाराष्ट्रातील सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात उष्ण व दमट वातावरण राहील. मुंबई परिसरात कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाईल, तर किमान तापमान 22 ते 23 अंशांच्या आसपास राहील. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चौथ्या दिवशी यलो अलर्ट लागू राहील. या भागांत तापमानात वाढ होईल आणि काही ठिकाणी उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात आज दिवसाची सुरुवात तुलनेने थंड वातावरणात होईल. सकाळी हलका गारवा जाणवेल आणि काही भागांत किमान तापमान 18 ते 20 अंशांच्या दरम्यान राहील. मात्र दुपारनंतर सूर्यप्रकाश तीव्र होईल आणि कमाल तापमान 36 ते 37 अंशांपर्यंत पोहोचेल. दुपारच्या वेळेत उकाडा स्पष्टपणे जाणवेल. संध्याकाळनंतर तापमानात किंचित घट होईल, त्यामुळे रात्री पुन्हा थोडा गारवा जाणवेल.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहील. या दोन्ही विभागांत दुपारच्या वेळी तापमान झपाट्याने वाढेल. मराठवाड्यात कमाल तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत जाईल, तर किमान तापमान 17 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक राहील आणि काही भागांत कमाल तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत नोंदवले जाईल. किमान तापमान 19 ते 21 अंशांच्या आसपास राहील.
advertisement







