advertisement

Ashok Kharat : अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी, पण उद्या पुन्हा हजर करणार, नेमकं घडलं काय?

Last Updated:

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. खरातच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे.

14 दिवसांची न्यायलयीन कोठडी
14 दिवसांची न्यायलयीन कोठडी
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. खरातच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे. दुसऱ्या गुन्हासाठी त्याला पुन्हा एकदा उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला काय शिक्षा दिली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि पीडित महिलांचं लक्ष लागलं आहे.
29 मार्च रोजी खरातला कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढविली होती. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावे दुसऱ्याच्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. आज मात्र कोर्टानं पोलीस कोठडी न देता न्यायालयीन 14 दिवसांची कोठडी दिली आहे. त्यामुळे खरातच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चाही रंगली आहे.
advertisement

७ मिनिटांत सुनावणी.....

आज कोर्टातील सुनावणी अवघी ७ मिनिटात पूर्ण झाली. आज कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. अशोक खरातला यापूर्वी तीन वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीत त्याला न्यायलयीन कोठडी मिळणार असल्याचे म्हटले जात होते.
खरातविरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी, २ एप्रिल रोजी त्याला इतर दुसऱ्या गुन्ह्यात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळावी असा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी, पण उद्या पुन्हा हजर करणार, नेमकं घडलं काय?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement