advertisement

Railway Update: होळीआधी मध्य रेल्वेचं गिफ्ट! पुण्यातून नागपूरसह ‘या’ शहरांसाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Central Railway Update: होळीच्या सणाला रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पुण्यातून नागपूरसह इतर प्रमुख शहरांसाठी विशेष गाड्या चालवणार आहे.

Central Railway: होळीआधी मध्य रेल्वेचं गिफ्ट! पुण्यातून नागपूरसह ‘या’ शहरांसाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
Central Railway: होळीआधी मध्य रेल्वेचं गिफ्ट! पुण्यातून नागपूरसह ‘या’ शहरांसाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
पुणे: होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेले नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी परततात. या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने होळी उत्सवानिमित्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत. पुण्यातून सुटणाऱ्या दानापूर, गोरखपूर, नागपूर आणि हजरत निजामुद्दीन या मार्गांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण 18 फेब्रुवारीपासून ऑनलाइन चालू होणार आहे.
गोरखपूर, दानापूर व नागपूरसाठी अतिरिक्त फेऱ्या
पुण्यातून गोरखपूर आणि दानापूरकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे–गोरखपूर मार्गावर 32 दैनिक विशेष फेऱ्या, पुणे–दानापूर मार्गावर 32 दैनिक विशेष फेऱ्या तसेच पुणे–दानापूर दरम्यान 8 द्वि-साप्ताहिक विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
advertisement
पुणे-नागपूर प्रवास सोपा
पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01461 ही 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता पुण्यातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01478 ही 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री सुमारे 11.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
advertisement
पुणे–गोरखपूर विशेष गाडी
पुणे–गोरखपूर मार्गावर विशेष गाडी क्रमांक 01415 ही 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान दररोज सकाळी 6.50 वाजता पुण्यातून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे 4 वाजता गोरखपूरला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक 01416 ही 22 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान दररोज सायंकाळी 5.30 वाजता गोरखपूरहून निघेल. ही गाडी पुण्यात तिसऱ्या दिवशी पहाटे सुमारे 3.15 वाजता दाखल होईल.
advertisement
पुणे–दानापूर विशेष गाडी
पुणे–दानापूर द्वि-साप्ताहिक गाडी क्रमांक 01449 ही 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान दुपारी 3.30 वाजता पुण्यातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे 2.45 वाजता दानापूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01450 ही 23 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान सकाळी 5 वाजता दानापूरहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 6.15 वाजता पुण्यात दाखल होईल.
advertisement
पुणे–दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी जाहीर
पुणे–दानापूर दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01481 ही 23 व 27 फेब्रुवारी तसेच 2 व 6 मार्च रोजी सायंकाळी 7.55 वाजता पुण्यातून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 4.20 वाजता दानापूरला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक 01482 ही 25 फेब्रुवारी तसेच 1, 4 व 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पुण्यात दाखल होईल. या अतिरिक्त फेऱ्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Railway Update: होळीआधी मध्य रेल्वेचं गिफ्ट! पुण्यातून नागपूरसह ‘या’ शहरांसाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement