General Knowledge : पाण्याच्या बाटलीचा तळ सपाट, मग कोल्ड्रिंकच्या बाटलीच्या तळाला उंचवठा का असतो? 99 टक्के लोकांना माहित नाही कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मिनरल वॉटर किंवा पाण्याच्या बाटल्यांचा तळ हा बहुतांश वेळा सपाट असतो, पण कोका कोला, पेप्सी किंवा इतर कोणत्याही कोल्ड ड्रिंकच्या बाटलीच्या खाली मात्र 5-6 उंचवटे किंवा विशिष्ट डिझाइन असतं.
कडाक्याचं ऊन असो किंवा मित्रांसोबतची पार्टी, हातात थंडगार कोल्ड ड्रिंकची बाटली आली की जिवाला सुख वाटतं. कोल्ड ड्रिंक पिताना तुम्ही कधी त्या बाटलीच्या तळाशी लक्ष दिलं आहे का? मिनरल वॉटर किंवा पाण्याच्या बाटल्यांचा तळ हा बहुतांश वेळा सपाट असतो, पण कोका कोला, पेप्सी किंवा इतर कोणत्याही कोल्ड ड्रिंकच्या बाटलीच्या खाली मात्र 5-6 उंचवटे किंवा विशिष्ट डिझाइन असतं.
advertisement
अनेकांना वाटतं की हे केवळ बाटली आकर्षक दिसण्यासाठी केलेलं डिझाइन आहे. पण वास्तवात, हे डिझाइन बाटलीला फुटण्यापासून वाचवण्यासाठी आणि तिला स्थिरता देण्यासाठी केलेलं एक जबरदस्त इंजिनिअरिंग आहे. जर हा तळ सपाट असता, तर कदाचित ती बाटली तुमच्या हातात येण्यापूर्वीच फुटली असती. या पेटालॉइड बेसमागील नेमकं शास्त्र काय आहे, ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
जेव्हा वायू बाटलीत भरला जातो, तेव्हा तो आतून प्रचंड दाब निर्माण करतो. जर बाटलीचा तळ सपाट असता, तर या दाबामुळे तो खालच्या बाजूने बाहेर फुगला असता. परिणामी, बाटली सरळ उभी राहू शकली नसती आणि डळमळीत होऊन पडली असती. बाटलीच्या खाली जे 5-6 उंचवटे असतात, त्यांना पेटालॉइड बेस (Petaloid Base) म्हणतात. हे उंचवटे आतील वायूचा दाब सर्व बाजूंनी समान रीतीने विभागतात. यामुळे बाटलीवर एकाच ठिकाणी ताण येत नाही आणि ती अत्यंत मजबूत राहते.
advertisement
पाण्याच्या बाटल्या सपाट का असतात?तुम्ही पाहिलं असेल की शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचा तळ जास्त करून सरळ किंवा थोडा आत दाबलेला असतो. याचं कारण साधं आहे. पाण्यात गॅस नसतो. त्यामुळे पाण्याच्या बाटलीवर आतून कोणताही अतिरिक्त दाब नसतो. म्हणूनच त्यांना पेटालॉइड बेसची गरज भासत नाही. याउलट, कोल्ड ड्रिंकची बाटली वाहतुकीदरम्यान किंवा फ्रीजमध्ये ठेवताना तापमानातील बदलामुळे प्रसरण पावते, तेव्हा हा विशिष्ट आकार तो बदल सोसून घेण्यास मदत करतो.
advertisement
केवळ दाबासाठीच नाही, तर ही रचना बाटली बनवताना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकलाही अधिक ताकद देते. बाटली भरताना किंवा ती रॅकमध्ये उभी करून ठेवताना या डिझाइनमुळे तिला एक भक्कम पाया मिळतो. हे डिझाइन बाटलीला जमिनीवर स्थिर ठेवण्यास मदत करते आणि अचानक बसणाऱ्या धक्क्याने ती फाटण्यापासून किंवा डॅमेज होण्यापासून वाचवते.
advertisement










