Fake Rice Identification : तुम्ही नकली तांदूळ खाताय? अजिबात करू नका दुर्लक्ष, एका मिनिटांत असं करा चेक..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये नकली तांदळाचा दावा केला जातोय. हे तांदुळ प्लास्टिकपासून बनवले जातात आणि ते हुबेहुब खऱ्या तांदळासारखे दिसतात.
मुंबई : भात हा भारतीय खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशातील कोणातही भाग घेतला तरी तेथील जेवनात भात हा असतोच. देशभरातील लोक भात आवडीने खातात. त्यामुळे देशात तांदळाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. अनेकांनातर जेवणात भात नसेल तर जेवण पूर्ण झाल्यासराखं वाटत नाही, तर काहींची भूक भागत नाही. घरच्या जेवणात तर भात असतो. पण हॉटेलमध्ये देखील जिरा राईस आणि अळणी भात असे पदार्थ लोक आवडीने खातात. परंतु आता भातासंदर्भात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये नकली तांदुळ बाजारात येत असल्याचा दावा केला जात आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये नकली तांदळाचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हे तांदुळ प्लास्टिकपासून बनवले जातात आणि ते हुबेहुब खऱ्या तांदळासारखे दिसतात. त्यामुळे दोन्हींतील फरक शक्यतो खरेदी करताना ओळखता येत नाही, असा दावा देखील या व्हिडिओंमधून केला जात आहे. दरम्यान हा खोट्या तांदळाचा दावा नेमका खरा की खोटा याबाबत देखील दावे प्रतिदावे केले जात आहे. परंतु आपण सावधगिरी बाळगणं कधीही चांगलं असतं.
advertisement
खोटे तांदुळ कसे ओळखाल?
पद्धत 1 : खोटे तांदुळ ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत. सर्वात आधी थोडेसे तांदुळ घ्या आणि ते जाळण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला प्लॅस्टिक जळण्याचा वास आला तर समजून जा की ते खोटे तांदुळ आहेत.
पद्धत 2 : खोटे तांदुळ ओळखण्याची दुसरी पद्धत देखील अतिशय सोपी आहे. एका काचेच्या ग्लासात किंवा छोट्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडे तांदुळ टाका. तांदुळ पाण्यावर तरंगू लागले तर समजतून जा की ते खोटे तांदुळ आहेत. खरे तांदुळ पाण्यावर तरंगत नाहीत.
advertisement
पद्धत 3 : एका पॅनमध्ये तेल टाका आणि गरम होऊ द्या. यानंतर त्यात थोडे तांदुळ टाका. हे तांदुळ वितळले किंवा पॅनला चिकटू लागले तर समजून जा की ते खोटे तांदुळ आहेत.
टीप : हे लक्षात घ्या की, प्रत्येक वेळी खोटे तांदुळ ओळखण्याची ही पद्धत 100 टक्के लागू होईलच असं नाही. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला खोटे तांदुळ असल्याची शंका असेल तर ते या वरील पद्धतींचा वापर करून तुम्ही ओळखू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 3:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fake Rice Identification : तुम्ही नकली तांदूळ खाताय? अजिबात करू नका दुर्लक्ष, एका मिनिटांत असं करा चेक..









