Nashik News: दिवसभर मिळेल ते काम करायचा, संध्याकाळी चोरी करायचा; आडगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सकाळी मिळेल तिथे काम करायचा आणि संध्याकाळी शहरामध्ये किंवा परिसरामध्ये बाईकांची चोरी करणाऱ्या चोराची आडगाव पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक: नाशिक आणि परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चोरांचा सुळसुळाट झाला आहे. सध्या पोलीस नाशिक शहरामध्ये ॲक्टिव्ह मोडवर आले असून पोलिसांकडून चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. सकाळी मिळेल तिथे काम करायचा आणि संध्याकाळी शहरामध्ये किंवा परिसरामध्ये बाईकांची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी बाईकची चोरी करणाऱ्या चोरट्याला ओझर मधून अटक केली आहे. चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या या घटनेनंतर परिसरामध्ये नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दिवसभर मिळेल ते मोलमजुरीचे काम करून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आडगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून 10 लाखांच्या एकूण 16 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या सर्व दुचाकींची चौकशी केली जात आहे. चौकशी करून पोलिसांकडून पुढची कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून सर्व विचारपूस केली जात आहे. राजेंद्र हिरामण वाघमारे असे, दुचाकी चोराचे नाव आहे. त्याने अनेक दुचाकी मध्यप्रदेशातील ग्रामीण भागांमध्ये नेऊन विकल्याची माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.
advertisement
आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक गुन्हा शोध पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह त्यांच्या टीमने केलेल्या चौकशीमध्ये राजेंद्र वाघमारेने कोणकोणत्या परिसरामध्ये चोरी केली, याची माहिती मिळवली. राजेंद्र नाशिकमध्ये बाईकची चोरी करून मध्यप्रदेशातील ग्रामीण भागांमध्ये जाऊन त्याची विक्री करायची. आडगाव पोलिसांनी राजेंद्रकडून जवळपास 16 टु व्हिलर्स जप्त केलेल्या आहेत. चोरीची गोपनीय माहिती हवलदार दादासाहेब वाघ आणि इमरान नजीर शेख यांना मिळाली होती. या दोन्हीही हवलदारांमार्फत पोलिसांनी राजेंद्र वाघमारे यांच्यावर कारवाई केलेली आहे.
advertisement
दरम्यान, हवलदार दादासाहेब वाघमारे आणि इमरान नजीर शेख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी आणि त्यांच्या टीमने सापळा रचून संशयित वाघमारे याला अटक केलेली आहे. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने चोरीची कबूली देत इतरत्र चोरीचीही त्याने त्यांना माहिती दिलेली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: दिवसभर मिळेल ते काम करायचा, संध्याकाळी चोरी करायचा; आडगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या









