advertisement

सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांच्या विश्वासू आमदारामध्ये खडाजंगी, नेमका वाद काय झाला?

Last Updated:

आपल्या अस्तित्वावरच विषय आल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांना झापल्याचे पक्षातील विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

सुनेत्रा पवार-शिवाजीराव गर्जे-शिवाजीराव गर्जे
सुनेत्रा पवार-शिवाजीराव गर्जे-शिवाजीराव गर्जे
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई : सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना पक्षात एकटे पाडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून पक्षात सगळे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. त्याच पत्रात तटकरे आणि पटेल यांचे पदनाम नसल्याने त्यांना पदच्युत केले गेले काय? अशा चर्चाही रंगल्या. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या संघर्षाची पूर्ण राज्यभर चर्चा झाली. आपल्या अस्तित्वावरच विषय आल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांना झापल्याचे पक्षातील विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

सुनील तटकरे आणि शिवाजीराव गर्जे यांच्यात नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला १० मार्च रोजी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी स्वत:च्या अध्यक्षपदाचा उल्लेख केला. परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख केला नाही. विशेष म्हणजे या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. शिवाजीराव गर्जे हे पवार कुटुंबाचे विश्वासू मानले जातात.
advertisement
शिवाजीराव गर्जे यांचा पत्रात उल्लेख केला, मग तटकरे-पटेल यांच्या पदांचा उल्लेख पत्रात का नव्हता? असा प्रश्न अनेकांना पडला. यावरून तटकरे-पटेल यांचे पक्षातील स्थान धोक्यात आल्याची चर्चाही रंगली. यावरून मोठा वादंग उठलेला असताना ते पत्र कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे सांगितले जाते. सुनील तटकरे यांना हे कळाल्यावर त्यांनी गर्जे यांना झापल्याची चर्चा आहे.
advertisement
२६ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारीणीच्या कागदपत्रात केवळ राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या पदांचा उल्लेख करण्यावरून सुनील तटकरे यांनी शिवाजीराव गर्जे यांना समज देण्यात आल्याचे कळते. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र तयार करण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष असलेल्या आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यावरच होती. याच पत्रावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा झाली.
advertisement

कोण आहेत आमदार शिवाजीराव गर्जे?

आमदार शिवाजीराव गर्जे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे
शिवाजीराव गर्जे हे शासकीय सेवेत होते, उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले
त्यानंतर गर्जे यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यासाठी त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला
राष्ट्रवादीची निवड करून त्यांनी २००२ मध्ये पक्षात अधिकृत प्रवेश केला
गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते पक्षाची कार्यालयीन जबाबदारी सांभाळत होते
advertisement
त्यामुळे ते शरद पवार यांचे विश्वासू बनले, दरम्यानच्या काळात त्यांना आमदारकीने अनेकदा हुलकावणी दिले
मात्र दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी शिवाजीराव गर्जे यांना दिलेला शब्द पाळला, त्यांना आमदार केलं
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांच्या विश्वासू आमदारामध्ये खडाजंगी, नेमका वाद काय झाला?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement