Sinhagad Express : पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; सिंहगड एक्सप्रेसबाबत आली मोठी अपडेट
Last Updated:
Pune Mumbai Train : जर तुम्हीही सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. नक्की कोणता बदल झाला आहे किंवा वेळेत बदल याबाबतची सविस्तर माहिती वाचा.
पुणे : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जागा न मिळाल्यामुळे अनेक तिकीटधारक प्रवासी मासिक पासधारकांसाठी राखीव डब्यांमध्ये चढतात. यामुळे पासधारक आणि इतर प्रवाशांमध्ये वाद होतात. विशेषतहा महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी
ही समस्या लक्षात घेऊन पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र राखीव डबा देण्याची मागणी केली आहे. यासाठी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. तसेच डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्सप्रेसमध्ये नियमित तिकीट तपासणी व्हावी यासाठी सह्यांची मोहीमही राबवण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार पुणे-मुंबई मार्गावरील या गाड्या हजारो नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी जीवनवाहिनी आहेत. मात्र, कोरोना काळानंतर डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. सिंहगड एक्सप्रेसचे पूर्वी 19 डबे होते ते सध्या 14 वर आले आहेत. त्यामुळे अनारक्षित प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एकच जनरल डबा असल्याने प्रवाशांना उभे राहायलाही जागा मिळत नाही.
advertisement
महिलांची सुरक्षितता आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी स्वतंत्र महिला डबा आणि किमान तीन जनरल डबे पुन्हा जोडावेत अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 1:25 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sinhagad Express : पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; सिंहगड एक्सप्रेसबाबत आली मोठी अपडेट









