MHADA Lottery: मुंबई-ठाणेकरांसाठी बंपर लॉटरी, अडीच हजार घरांची सोडत, स्वस्तातली घरं कुठं अन् किती?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
MHADA Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अडीच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. एप्रिलअखेर ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळातील सोडतीत घरांच्या किमती बघून अनेकांना घाम फुटला. निराश झालेल्या अर्जदारांचे डोळे कोकण मंडळाच्या सोडतीकडे लागले होते. आता अशा अर्जदारांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकण मंडळाच्या सोडतींची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यात अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना स्वस्तात घरे मिळण्याची आशा आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अडीच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. एप्रिलअखेर ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये साधारणपणे एक हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील, असे सांगण्यात येत आहे. या घरांच्या किमती 20 ते 30 लाखांच्या दरम्यान असतील.
advertisement
कुठं किती घरे?
कोकण मंडळात अल्प उत्पन्न गटासाठी चितळसर मानपाडा येथे 200 ते 250 घरे उपलब्ध होतील. तर बाळकुमला मध्यम उत्पन्न गटासाठी 206 घरे असतील. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत खासगी विकासकांकडून काही घरे म्हाडाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिका अंतर्गत 5 प्रकल्पांत 138 घरे, कल्याण डोंबिवलीच्या 3 प्रकल्पांत 40 घरे, नवी मुंबईतील एका प्रकल्पात 21 घरे आणि वसई विरारच्या 2 प्रकल्पांत 38 घरे उपलब्ध होतील.
advertisement
या गटाला दिलासा
एप्रिल महिन्याअखेरीस कोकण मंडळाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यात साधारण 1 हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. या घरांच्या किमती अंदाजे 20 ते 30 लाखांच्या दरम्यान असतील. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटाला मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: मुंबई-ठाणेकरांसाठी बंपर लॉटरी, अडीच हजार घरांची सोडत, स्वस्तातली घरं कुठं अन् किती?










