डेब्यू फिल्म अन् डायरेक्टरनं साटकन दिली कानाखाली, ओक्साबोक्शी रडली मराठी अभिनेत्री; वडिलांनी बंद पाडलेलं शूटिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नॅशनल अवॉर्ड मिळवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जिच्या डेब्यू फिल्मवेळी भयंकर प्रसंग घडलेला. डायरेक्टरनं तिच्या साटकन कानाखाली दिली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पल्लवी जोशी म्हणाली, "त्यांनी मला रडायला सांगितले पण मी फक्त हसत होते. अनेक अयशस्वी टेक्सनंतर शांतीलाल काकांनी माझ्या वडिलांना मला कानशिलात मारायला सांगितलं. माझ्या वडिलांनी नकार दिला. त्यांनी कॅमेऱ्याच्या मागून मला रागावल्याचं नाटक केलं. मला माहित होते की ते गंभीर नव्हतं आणि त्यामुळे मला आणखी जोरात हसू आले." पण याच्यानंतर जे घडलं तर पल्लवी जोशी आणि तिच्या वडिलांसाठीही खूप शॉकिंग होतं.
advertisement
advertisement
शॉट संपल्यानंतर मी उठले आणि 'मला या चित्रपटासाठी शूट करायचे नाही असं म्हणत ओरडत सुटले. यानंतर पल्लवी जोशीच्या वडिलांचे दिग्दर्शक मित्रासोबत भांडण झालं. पल्लवीचे वडिल चकित झाले होते. त्यांनी दिग्दर्शकाला विचारले, तुम्ही माझ्या मुलीला कानशिलात कशी मारू शकता? शूटिंग थांबवण्यात आले आणि काही दिवस शांततेत गेले असले. पल्लवी शांत झाल्यावर दिग्दर्शकाने अखेर शूटिंग पुन्हा सुरू केलं.
advertisement
पल्लवी जोशी यांना 1992 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1990 च्या दशकात 'रुक्मावती की हवेली', 'त्रिशाग्नी' आणि 'सौदगर' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे पल्लवी जोशी यांची कारकीर्द समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये बहरली.1992 मध्ये 'वो छोकरी'साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि नंतर तिने श्याम बेनेगल यांच्या 'द मेकिंग ऑफ द महात्मा'मध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारली.







