advertisement

Bhiwandi Traffic : भिवंडीकरांनो लक्ष द्या! आजपासून वाहतुकीत मोठा बदल; 'इतके' दिवस सोसावा लागणार त्रास

Last Updated:

Bhiwandi Traffic Update : भिवंडी शहरातील नागरिकांना आजच्या दिवस वाहतूकीसाठी अनेक पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. नक्की या मागे कोणते कारण आहे आणि कधीपर्यंत असे करावे लागणार आहे.

भिवंडी शहरात मिरवणुकीमुळे दुपारी ४ वाजल्यापासून काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे
भिवंडी शहरात मिरवणुकीमुळे दुपारी ४ वाजल्यापासून काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहणाऱ्या किंवा या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत विशेष माहिती समोर येत आहे. या शहरात वाहतुकीत काही तासांसाठी बदल करण्यात आलेले आहे. भिवंडी येथील वाहतूक विभागाने विशेष सूचना जारी केलेली आहे.
भिवंडीत तासनतास अडकण्यापेक्षा ही बातमी वाचा
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरात आज हाफीजीबाबा दर्ग्याच्या संदल मिरवणूकीमुळे वाहतूककोंडी होऊन नये म्हणून वाहतूकीत बदल करण्यात आलेला आहे. या होणाऱ्या मिरवणूकीसाठी शहरातील काही महत्त्वाचे रस्ते दुपारी 4 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांनी प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा असे पोलिसांनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे.
advertisement
कसे असेल वाहतूक बदल?
नियमित केलेल्या वाहतूक बदलांनुसार, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वंजारपट्टी नाका या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हा मार्ग बंद राहणार आहे. शिवाय वंजारपट्टी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरही वाहतूक बंद असणार आहे.
आज होणारी भिवंडी शहरातील मिरवणूक सुरळीत पार पडावी तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनीही विशेष बंदोबस्त ठेवलेले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपत्कालीन सेवांसाठी मात्री ती सोय ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
नागरिकांनी आजच्या दिवस अनावश्यक प्रवास टाळावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे मिरवणूक शांत आणि सुरक्षितेते पार पडण्यास मोठी मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Bhiwandi Traffic : भिवंडीकरांनो लक्ष द्या! आजपासून वाहतुकीत मोठा बदल; 'इतके' दिवस सोसावा लागणार त्रास
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement