रिक्षात प्रवासी भरण्यावरून 2 रिक्षाचालकांत वाद; रागात सिमेंटची वीट उचलून डोक्यात घातली अन्..पुण्यात रक्तरंजित थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरातील कात्रज परिसरात रिक्षात प्रवासी भरण्यावरून दोन गटांत वाद झाला. या वादातून एका ४९ वर्षीय रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्ट (पेव्हिंग ब्लॉक) घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे.
पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात रिक्षात प्रवासी भरण्यावरून दोन गटांत वाद झाला. या वादातून एका ४९ वर्षीय रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्ट (पेव्हिंग ब्लॉक) घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. संतोषनगर, कात्रज) हे रिक्षा चालक असून ते नेहमीप्रमाणे कात्रज परिसरात प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबले होते. यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी पुजारी यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादादरम्यान आरोपींनी रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून थेट पुजारी यांच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात पुजारी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी शेखर पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ उर्फ टायगर याच्यासह इतर दोन साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
नाचताना धक्का लागल्याने वाद
दुसऱ्या एका घटनेत नृत्य करताना झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना औंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसं टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल तुजारे बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गाँधी वसाहतीत सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करत होते. साउंड स्पीकरवर गाणी लावण्या लावून त्यावेळी नाचताना आरोपी घडसिंग याला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला. याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 7:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रिक्षात प्रवासी भरण्यावरून 2 रिक्षाचालकांत वाद; रागात सिमेंटची वीट उचलून डोक्यात घातली अन्..पुण्यात रक्तरंजित थरार







