advertisement

Weather Alert: दुपारी घामाच्या धारा अन् संध्याकाळी गारपीट, 7 जिल्ह्यांवर 72 तास संकट

Last Updated:

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ ते ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.

पाऊस
पाऊस
दुपारी चटके बसेल इतकं प्रचंड ऊन आणि अचानक ३ नंतर बदलणारं वातावरण, अंधार, सोसाट्याचा वारा आणि वादळी वारे आणि तुफान गारांचा पाऊस अशी भीषण परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. पाकिस्तान आणि अफगाणीस्तानमधून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे देशभरात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू आहे.
राजस्थानमध्ये तर गारपिटीनं बर्फासारखी चादर पसरावी अशी परिस्थिती आली आहे. पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. पुढचे 72 तास परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात दमट वातावरणामुळे लोक हैराण झाले आहेत.
अवकाळी पावसाचा विकेण्डला धुमाकूळ
राज्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच हवामानाने रंग बदलायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ ते ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
विदर्भावर मोठं संकट
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार गारपीट होऊ शकते. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आधीच झाली आहे, आता हा जोर आणखी वाढणार आहे.
advertisement
विदर्भात आज तापमानात ३ ते ५ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ३ आणि ४ एप्रिलला विदर्भातही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर उष्णता आणि आर्द्रता वाढणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. विशेषतः वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे.
का पडतोय पाऊस?
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या दक्षिण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर एक 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' तयार झाले आहे. तसेच, एक ट्रफ लाईन मराठवाड्यापासून थेट दक्षिण तामिळनाडूपर्यंत पसरली आहे. या दोन प्रणालींमुळे महाराष्ट्रात सातत्याने बाष्प येत आहे, ज्यामुळे अचानक ढग दाटून येऊन पाऊस पडत आहे.
advertisement
रविवारपासून उकाडा वाढणार
४ एप्रिलपर्यंत कमाल तापमानात ३ ते ५ अंशांनी घट होईल, मात्र त्यानंतर पुन्हा पारा वाढायला सुरुवात होईल. ४ एप्रिलनंतर तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. ४ एप्रिलपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहू शकतो.
advertisement
त्यानंतर ५ एप्रिलपासून पावसाची तीव्रता थोडी कमी होईल, पण ७ एप्रिलला पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्याने पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल. काढणीला आलेली पिके आणि फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: दुपारी घामाच्या धारा अन् संध्याकाळी गारपीट, 7 जिल्ह्यांवर 72 तास संकट
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement