advertisement

अशोक खरातचे कोठडीत बेकार हाल, लॅवीश लाईफ जगणाऱ्या कॅप्टनवर नियतीचा प्रकोप, औषधंही साथ देईना

Last Updated:

Ashok Kharat News: १७ दिवसांआधी अनेकांवर वचक असणारा आणि लॅवीश लाईफ जगणारा अशोक खरात आता हतबल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे आता कोठडीत बेकार हाल सुरू असल्याची माहिती आहे.

अशोक खरातचे पोलीस कोठडीत हाल
अशोक खरातचे पोलीस कोठडीत हाल
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला १८ मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. त्याला अटक करून आता जवळपास १७ दिवस झाले आहेत. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत आहे. त्याची नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशीत अशोक खरातबाबबत अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. त्याने केवळ महिलांचं लैंगिक शोषणच नाही केलं तर इतरही बेकायदेशीर कामांमध्ये तो गुंतला होता, अशी माहिती समोर येत आहे. १७ दिवसांआधी अनेकांवर वचक असणारा आणि लॅवीश लाईफ जगणारा अशोक खरात आता हतबल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे आता कोठडीत बेकार हाल सुरू असल्याची माहिती आहे.

अशोक खरातसोबत पोलीस कोठडीत काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचं शरीर विविध व्याधींमुळे आतून पोखरलं आहे. त्याला विविध प्रकारचे पाच आजार झाले आहेत. या आजारांमुळे पोलीस कोठडीत असलेला कॅप्टन खरात हवालदिल झाला आहे. तो एकीकडे गोळ्या औषधं घेत आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून होणारी सततची चौकशी यामुळे तो प्रचंड तणावात असल्याची माहिती आहे.
advertisement

७ किलो वजन कमी झालं

याच तणावामुळे मागच्या १७ दिवसांत अशोक खरातचं वजन सात किलोने कमी झालं आहे. अशोक खरातला जेव्हा पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. यात अशोक खरातचं वजन ७९ किलो इतकं असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता त्याचं वजन सात किलोनं कमी झाल्याची माहिती आहे. म्हणजेच अशोक खरात पोलीस कोठडीत असल्यापासून दरदिवशी त्याचं वजन ४०० ते ४५० ग्रॅमने कमी होत आहे. त्यामुळे त्याचं शरीरही त्याला सध्या साथ देत नसल्याचं दिसत आहे.
advertisement
एकीकडे आजारांवर औषधांचा मारा आणि दुसरीकडे पोलिसांचा चौकशीसाठी ससेमिरा अशा दुहेरी कात्रीत सध्या अशोक खरात अडकला आहे. मागच्या ३०-३५ वर्षात त्याने विणलेलं विकृतीचं जाळं आता त्याच्याच अंगलट येत आहे. त्याचे विविध कुकर्म समोर येत आहेत. त्याचे कारनामे ऐकून पोलीसही चक्रावून जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातला पॅरालिसीसमुळे एक हात वर करता येत नाही. तो रोज मेंदू विकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातचे कोठडीत बेकार हाल, लॅवीश लाईफ जगणाऱ्या कॅप्टनवर नियतीचा प्रकोप, औषधंही साथ देईना
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement