Dharashiv Traffic: छत्रपती संभाजीनगर- सोलापूर- हैद्राबाद मार्गावर 40 किमी वाहनाच्या रांगा, सामान्य भाविकांसह भाजपा आमदारांनाही ट्रॅफिकचा फटका
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर- सोलापूर- हैद्राबाद मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झालेली आहे. 40 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून याचं शुटिंग ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये, चैत्र पौर्णिमेनिमित्त असणाऱ्या यात्रेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर- हैद्राबाद आणि सोलापूर- छत्रपती संभाजीनगर अशा दोन्हीही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झालेली आहे. दोन्हीही महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून यात्रेमुळे प्रवाशांची चांगलीच पंचाईत झालेली आहे. गेल्या 5 तासांपासून भर उन्हात वाहतूकदार वाहतुक कोंडीमध्ये उभे आहेत.
छत्रपती संभाजीनगर- हैद्राबाद आणि सोलापूर- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतुक कोंडीमुळे 40 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. वाहनाच्या रांगांची शुटिंग ड्रॉन कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आले आहे. एकही इंच गाडी पुढे किंवा मागे जाण्यासाठी पर्याय नाहीये. या ट्रॅफिकमध्ये फक्त सामान्य माणूस नाही तर, भाजपा आमदार राणा पाटील देखील सुद्धा गेल्या चार ते पाच तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. राणा पाटील यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी या वाहनांच्या रांगेत अडकले आहेत. गेल्या 5 तासांपासून महामार्ग सह सगळेच रस्ते जाम असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सामान्य भाविकांना, वय वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे.
advertisement
सामान्य भाविकांसह आमदारांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे सध्या सर्वत्रच एकच गोंधळ उडाला आहे. गेल्या 5 तासांपासून सर्वच वाहने एका पाठो पाठ एकाच रांगेमध्ये उभे आहेत. भर उन्हामध्ये वाहतूक दारांना उभे राहावे लागत असल्यामुळे सामान्य भाविकांसह वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने आणि महसूल विभागाने केलेल्या यात्रा नियोजनाचा पूर्णपणे बट्टयाबोळ झालेला पाहयला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या यात्रेसंबंधीच्या नियोजनावर भाजप आमदार राणा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता ही संपूर्ण वाहतुक कोंडीची समस्या सुटण्यासाठी आणखी किती वेळ लागतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये, चैत्र पौर्णिमेनिमित्त 2 एप्रिल आणि 3 एप्रिल असे दोन दिवस जत्रा असणार आहे. यात्रेतील गर्दीचा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम पाहायला मिळत आहे. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे छत्रपती संभाजीनगर- हैद्राबाद आणि सोलापूर- छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. ही वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी आणखी किती वेळ लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 4:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Traffic: छत्रपती संभाजीनगर- सोलापूर- हैद्राबाद मार्गावर 40 किमी वाहनाच्या रांगा, सामान्य भाविकांसह भाजपा आमदारांनाही ट्रॅफिकचा फटका










