advertisement

IND vs PAK : मॅच जिंकताच हार्दिक पांड्या अन् कुलदीप यादवमध्ये राडा, सूर्यानेही झाप झाप झापलं, 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर काय घडलं?

Last Updated:

Hardik pandya angry on Kuldeep : टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध मॅच जिंकताच टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये मोठा राडा झाला. हार्दिक पांड्याने कुलदीप यादवला झाप झाप झापलं.

Hardik pandya and suryakumar angry on Kuldeep Yadav
Hardik pandya and suryakumar angry on Kuldeep Yadav
India vs Pakistan Video : नेहमीप्रमाणे टीम इंडियाने यावेळी देखील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला अन् सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. पाकिस्तानी स्पिनर्सच्या भीती घालून टीम इंडियाला कमकुवत करण्याचा डाव फसला. टीम इंडियाच्या बॅटर्सने आपल्या आक्रमक शैलीत 175 धावा स्कोरबोर्डावर उभा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 114 धावाच करू शकला. अशातच मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने मोठं सेलीब्रेशन न करता पाकिस्तानला जागा दाखवली. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. हार्दिक पांड्या कुलदीप यादववर चांगलाच भडकला होता.

नेमकं काय झालं?

मॅच संपवण्यासाठी सूर्यकुमार यादवने आपला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला. हार्दिक पांड्याला 18 वी ओव्हर देण्यात आली होती. हार्दिक पंड्या या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला बॉलिंग करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आफ्रिदीने एक हवेत शॉट मारला, जो सरळ कुलदीप यादवच्या दिशेने गेला. कुलदीपने तो सोपा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटला आणि थेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला. पाकिस्तानला यामुळे सहा रन्स मिळाले अन् हार्दिक भडकला.
advertisement
advertisement

हार्दिक सूर्यकुमारवर भडकला

ओव्हरच्या दुसऱ्या बॉलनंतर हार्दिकने कुलदीपला यावेळी काहीच बोललं नाही. हार्दिक सूर्यकुमारवर भडकला. कुलदीपला थर्ड मॅनला ठेव, असं हार्दिकने सूर्याला सांगितलं. त्यानंतर सूर्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 11 वा खेळाडू असणाऱ्या उस्मान तारिकचा बोल्ड काढला अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मात्र, इथंच राडा सुरू झाला.
advertisement
advertisement

कुलदीपला झाप झाप झापलं

हँडशेक करण्यासाठी टीम इंडिया जमली असताना हार्दिक पांड्याने कुलदीप यादवला धारेधर धरलं अन् कॅच सोडण्यावरून त्याला झाप झाप झापलं. त्यावेळी कुलदीप काहीसा नरमलेला दिसत होता. तर रिंकु सिंगने मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तर पुढे कॅप्टन सूर्यासोबत हँडशेक करताना देखील सूर्याने कुलदीप यादवकडे रागाने पाहून त्याचा समाचार घेतला. त्यामुळे टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये काहीचं चिंतेचं वातावरण होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मॅच जिंकताच हार्दिक पांड्या अन् कुलदीप यादवमध्ये राडा, सूर्यानेही झाप झाप झापलं, 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर काय घडलं?
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement