Ashok Kharat Case: अशोक खरातची बायको अजूनही सापडेना, 'त्या' प्रकरणाची कोर्टातून आली नवीन अपडेट
- Published by:Sachin S
Last Updated:
शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात, त्याची बायको कल्पना खरातसह ५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात २ जणांना अटक केली होती
शिर्डी : लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींनी चौकशीमध्ये धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर आता न्यायालयानेही दोन्ही आरोपींना आणखी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण, याच प्रकरणात अशोक खरातची बायको कल्पना खरात अजूनही फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात, त्याची बायको कल्पना खरातसह ५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात २ जणांना अटक केली होती. आज ३ दिवसांचा जामीन संपल्यानंतर दोन्ही आरोपींना शिर्डी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने आरोपींना पुन्हा एकदा तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातही या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणेला पुन्हा ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार आरोपी कल्पना खरात आणि इतर आरोपींचा अजूनही शोध बाकी आहे.
advertisement
या दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली होती. शिर्डीतील पतसंस्थेत 132 अकांऊट सापडले आहे. या खात्यामध्ये ५० कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाला आहे. या प्रकरणाचाही तपास बाकी आहे. खरात याचे आणखी साथीदार आहेत का? हे मुद्दे मांडत पोलिसांनी आरोपींनी आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली ती न्यायालयाने मंजूर केली आहे.
लुकआऊट नोटीस जारी
advertisement
कल्पना खरात गेल्या दोन दिवसांपासून फरार असून तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. ती परदेशात पळून जाऊ नये किंवा राज्याबाहेर हालचाली करू नये यासाठी एसआयटीने तिच्या विरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली आहे. खरात कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकांचीही आता चौकशी सुरू झाली असून, लवकरच या प्रकरणातील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
अशोक खरात याने शिर्डीतील शेतकऱ्याची जमिन बळकावल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या पाशात अडकवून त्याची कोट्यावधीची जमीन खरातने बळकावली होती. या प्रकरणी पोलिसांनी अशोक खरातसह ५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. जे काही पैशांचे व्यवहार आहे, जो तक्रारदार आहे, त्याला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते. एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते. आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली होती. शिर्डी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. एकूण अशोक खरात, त्याची पत्नी आणि आणखी ३ जण आहे. यापैकी दोघांना अटक केली आहे. अशोक खरातला देखील न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेणार आहोत, असं अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितलं.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 7:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अशोक खरातची बायको अजूनही सापडेना, 'त्या' प्रकरणाची कोर्टातून आली नवीन अपडेट








