advertisement

अस्सल घरगुती पद्धतीचे जेवण, खाण्यासाठी तास न् तास लोक इथे असतात उभे, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:
या ठिकाणी जेवणासाठी चक्क खवय्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याच ठिकाणांपैकी पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊस आहे.
1/7
पुण्यात अनेक जुने प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात. या ठिकाणी जेवणासाठी चक्क खवय्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याच ठिकाणांपैकी पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊस आहे.घरगुती खानावळ पद्धतीने सुरू झालेला हा व्यवसाय 101 वर्षांपर्यंत पोहोचला आहे.
पुण्यात अनेक जुने प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात. या ठिकाणी जेवणासाठी चक्क खवय्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याच ठिकाणांपैकी पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊस आहे. घरगुती खानावळ पद्धतीने सुरू झालेला हा व्यवसाय 101 वर्षांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
2/7
1925 साली कर्नाटकहून पुण्यात आलेले मणीअप्पा उडपीकर यांनी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयात पुण्याबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरगुती जेवणाची सोय व्हावी यासाठी म्हणून व्यवसायाची सुरुवात केली.

3/7
या ठिकाणी घरगुती पद्धतीने रुचकर जेवण तयार केले जाते. यामध्ये एक उसळ, आळूची भाजी, बिरड्याची उसळ, फळभाजी, कोशिंबीर, पोळ्या, भात, पापड, दही असं घरगुती पद्धतीने तयार केलेली थाळी दिली जाते.

4/7
इथे मिळणारे जेवण रुचकर असल्यामुळे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आजही खवय्यांची रांग पाहायला मिळते. अगदी तास न् तास लोक इथे उभे राहतात.

5/7
सध्याच्या घडीला एकत्र कुटुंबपद्धती संपत चालल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करणे यासाठी कोणाकडे एवढा वेळही नाही. त्यामुळे लोक इथे आवर्जून येत असतात. वर्षानुवर्षे अनेक नागरिक या जेवणाचा आस्वाद घेत असून, तब्येतीलाही यामुळे कोणताही अपाय होत नसल्याचे देखील उडपीकर सांगतात.

6/7
या ठिकाणी एका वेळी 50 लोक बसण्याची सुविधा आहे. अनेक लोक इथे जेवणाचा आस्वाद घेत असतात, असे उडपीकर सांगतात.

7/7
सध्या तिसऱ्या पिढीतील सुहास उडपीकर हे व्यवसाय सांभाळत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरांतील पेठांमध्ये गल्लोगल्ली खाणावळी, भोजनालये सुरू झाली. मात्र, शंभर वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना घरगुती जेवणाचा आनंद देणाऱ्या पूना बोर्डिंग हाउसची 'क्रेझ' आजही कायम आहे, असं सुहास उडपीकर सांगतात.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement