VIDEO : 2 वर्ल्डकप एक आयपीएल जिंकली, तरी माज केला नाही,मैदानावर कचरा उचलताना दिसला खेळाडू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि एकदा आयपीएलची ट्रॉफी उंचलणारा खेळाडू मैदानावर कचरा उचलताना दिसला आहे.या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.
Matthew Hayden Video : आयपीएल 2026 च्या हंगामात दररोज एकापेक्षा एक रंगतदार सामने सूरू आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आयपीएलची मजा यायला सूरूवात झाली आहे.या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि एकदा आयपीएलची ट्रॉफी उंचलणारा खेळाडू मैदानावर कचरा उचलताना दिसला आहे.या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.
खरं तर आयपीएलमध्ये एक वेळ अशी होती जेव्हा हा खेळाडू आपली स्पेशल बॅट (मुंगूस बॅट) घेऊन मैदानात उतरायचा आणि बॅटीने कहर करायचा. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला सगळेच घाबरायचे.आता या खेळाडूबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला हा खेळाडू नेमका कोण आहे? हे कळालच असेल. पण तरी जर कुणाला कळालं नसलं तरी हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन आहे.मॅथ्यू हेडन हा आयपीएलमधून निवृत्त झाला असला तरी तो यंदाच्या वर्षी कोच म्हणून सामील झाला आहे. मॅथ्यू हेडन हा गुजरात टायटन्सचा बॅटींग कोच आहे. हेडनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याने सर्वांचे मन जिंकले आहे.
advertisement
"Foreign coach teaching civic sense." 🇮🇳
IPL team Gujarat Titans' batting coach,
Matthew Hayden, collected garbage from the cricket ground and disposed of it properly.
Dear Indian cricketers, you are a celebrity. At least follow basic cleanliness ethics. pic.twitter.com/ctSPJrMfar
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) April 2, 2026
advertisement
व्हायरल व्हिडिओमध्ये मॅथ्यू हेडन मैदानावरील कचरा उचलताना दिसत आहे. मॅथ्यू हेडन आजूबाजूच्या पडलेल्या रिकाम्या बॉटल उचलून कचरा पेटीत टाकत आहे.खरं तर कचरा उचलणे हे काय हेडनचे काम नव्हते.तो एका मोठ्या टीमचा कोच होता. तो हवं तर आरामात बसून राहिला असता किंवा सामन्यानंतरही निघूनही गेला असताना पण त्याने तसं न करता मैदानातील कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हेडनची हीच कृती भारतीय चाहत्यांचे मन जिंकून गेली आहे.
advertisement
दरम्यान हा व्हिडिओ पाहून अनेक फॅन्स म्हणतात, युवा खेळाडूंनी या दिग्गज खेळाडूकडून काहितरी शिकलं पाहिजे. तसेच दुसऱ्या एका युझरने म्हटले की, विदेशी कोच नागरिकांना मैदानात कशी स्वच्छता राखायची हे शिकलं पाहिजे.त्यामुळे क्रिकेट फॅन्सना हेडनचे हे वागण प्रचंड आवडलं आहे.तसेच हेडनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 5:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 2 वर्ल्डकप एक आयपीएल जिंकली, तरी माज केला नाही,मैदानावर कचरा उचलताना दिसला खेळाडू







