हळूहळू खराब होतोय तुमचा Smartphone! बाथरुममध्ये घेऊन जाण्यापूर्वी ही गोष्ट तुम्हाला माहित असायलाच पाहिजे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक लोकांना असं वाटतं की आपला फोन 'वॉटर रेसिस्टंट' (IP68 रेटिंग असलेला) आहे, त्यामुळे त्याला काही होणार नाही. पण इथेच मोठी गल्लत होते. फोनचं रेटिंग हे थंड पाण्याच्या थेंबांसाठी असतं, गरम वाफेसाठी नाही.
मुंबई : आजच्या काळात आपला स्मार्टफोन हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बेडरूम असो वा ऑफिस, फोन आपल्या सोबत असतोच. पण हल्ली अनेकांना एक सवय लागली आहे, ती म्हणजे बाथरूममध्ये फोन नेण्याची. मग ते रील पाहण्यासाठी असो, गाणी ऐकण्यासाठी असो किंवा चॅटिंगसाठी.
पण अनेक लोक अंघोळीसाठी 'गिझर'चा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या बाथरूममधील गरम पाण्याची ती 'वाफ' (Steam) तुमच्या हजारो रुपयांच्या फोनला कायमचं निकामी करू शकते. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे! गिझरची वाफ तुमच्या फोनसाठी कोणत्याही 'सायलेंट किलर'पेक्षा कमी नाही.
अनेक लोकांना असं वाटतं की आपला फोन 'वॉटर रेसिस्टंट' (IP68 रेटिंग असलेला) आहे, त्यामुळे त्याला काही होणार नाही. पण इथेच मोठी गल्लत होते. फोनचं रेटिंग हे थंड पाण्याच्या थेंबांसाठी असतं, गरम वाफेसाठी नाही.
advertisement
वाफेचे कण हे पाण्याच्या थेंबांपेक्षा कितीतरी पटीने लहान असतात. जेव्हा तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता, तेव्हा ही वाफ फोनच्या चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि सिम ट्रेमधील अत्यंत सूक्ष्म छिद्रांमधून सहज आत शिरते. एकदा का ही वाफ आत गेली की, फोनच्या आतील थंड भागाच्या संपर्कात येऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते.
advertisement
जेव्हा ही आर्द्रता (Moisture) फोनच्या आत जमा होते, तेव्हा खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात
-मदरबोर्डवर गंज: पाण्याचे कण फोनच्या मदरबोर्डवर 'करोजन' म्हणजेच गंज निर्माण करतात.
-कॅमेरा लेन्स धुसर होणे: कॅमेरा लेन्सच्या आतून वाफ जमा झाल्यामुळे फोटो धुरकट येऊ लागतात.
-टच स्क्रीन आणि बॅटरी: तुमचा टच नीट काम करत नाही किंवा बॅटरी वेगाने संपू लागते. अनेकदा फोन आपोआप रिस्टार्ट व्हायला लागतो.
advertisement
स्मार्टफोन वाचवण्यासाठी 'या' ५ टिप्स फॉलो करा
जर तुम्हाला तुमचा फोन प्रिय असेल, तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा:
1. बाहेरच ठेवा: सर्वात उत्तम उपाय म्हणजे अंघोळीला जाताना फोन बाथरूमच्या बाहेर ठेवा.
2. ब्लूटूथ स्पीकरचा वापर: जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील, तर फोन बाहेर ठेवून वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर बाथरूममध्ये वापरा.
advertisement
3. झिपलॉक बॅग: जर फोन नेणे अनिवार्य असेल, तर तो 'झिपलॉक' बॅग किंवा वॉटरप्रूफ पाऊचमध्ये बंद करूनच न्या.
4. ओल्या स्थितीत चार्जिंग नको: जर फोनमध्ये ओलावा जाणवत असेल, तर तो कधीही चार्जिंगला लावू नका. यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं.
5. केस ड्रायर टाळा: फोन सुकवण्यासाठी कधीही 'हेअर ड्रायर' वापरू नका. ड्रायरची गरम हवा फोनचे सेन्सिटिव्ह पार्ट्स वितळवू शकते.
advertisement
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाफ किंवा पाण्यामुळे झालेल्या नुकसानाला (Liquid Damage) बहुतेक कंपन्या वॉरंटीमध्ये कव्हर करत नाहीत. त्यामुळे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला हजारो रुपयांचा फटका देऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 10:29 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हळूहळू खराब होतोय तुमचा Smartphone! बाथरुममध्ये घेऊन जाण्यापूर्वी ही गोष्ट तुम्हाला माहित असायलाच पाहिजे









