advertisement

IND vs PAK : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, वर्ल्ड कप सुरू असतानाच दोन दिग्गजांची हकालपट्टी!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, वर्ल्ड कप सुरू असतानाच दोन दिग्गजांची हकालपट्टी!
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, वर्ल्ड कप सुरू असतानाच दोन दिग्गजांची हकालपट्टी!
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. टी-20 वर्ल्ड कप सुरू असतानाच पाकिस्तान क्रिकेट टीमने दोन दिग्गज क्रिकेटपटूंची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर येत आहे. पाकिस्तान यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला त्यांचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे, या सामन्यातून बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांची हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पाकिस्तानी टीम मॅनेजमेंटमधील विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती येत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख मोहसिन नक्वी खूप संतापले आहेत. त्यांनी या विषयावर टीम व्यवस्थापक नावेद अक्रम चीमा यांच्याशीही चर्चा केली आहे. सूत्रांनी सांगितले की, 'पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी सामना संपण्यापूर्वीच प्रेमदासा स्टेडियममधून निघून गेले, कारण पाकिस्तानचा पराभव आधीच निश्चित होता.'
advertisement

पीसीबी अध्यक्षांची कठोर कारवाई

मोहसिन नक्वी यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत टीम मॅनेजरला संदेश पाठवला आहे, ज्यामध्ये खेळाडूंनी केलेली अशी कामगिरी अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा मैदानामध्ये सामना झाला. या सामन्यातून पाकिस्तानी चाहत्यांना बाबर आझम आणि शाहिन आफ्रिदी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दोन्ही दिग्गजांनी पाकिस्तानी चाहत्यांची घोर निराशा केली.
advertisement
स्वत:ला पाकिस्तानचा प्रीमियम फास्ट बॉलर समजणाऱ्या शाहिन शाह आफ्रिदीने त्याच्या 2 ओव्हरमध्ये 15.50 च्या इकोनॉमी रेटने तब्बल 31 रन दिल्या, ज्यात त्याला फक्त एक विकेट मिळाली. आफ्रिदी त्याच्या स्पेलमध्ये खूपच महागडा ठरला, त्यामुळे मॅच पाकिस्तानच्या हातातून निघून गेली.
दुसरीकडे बाबर आझमसारख्या अनुभवी खेळाडूकडून पाकिस्तानला भक्कम खेळीची अपेक्षा होत, पण तोदेखील पॅव्हेलियनमध्ये लवकर परतला. 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये 114 रनवर ऑलआऊट झाला. बॉलिंगमध्ये घोर निराशा केलेल्या शाहीन आफ्रिदीने बॅटिंगमध्ये 23 रन निश्चित केल्या, पण त्याचा कोणताच फायदा टीमला झाला नाही.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान ग्रुप स्टेजमधला त्यांचा शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचं टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल आणि युएसए सुपर-8 मध्ये क्वालिफाय होईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, वर्ल्ड कप सुरू असतानाच दोन दिग्गजांची हकालपट्टी!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement