advertisement

Hruday Mudra : शारीरिक, मानसिक ताणावर करा योगासनांनी मात, हृदय मुद्रा केल्यानं वाटेल शांत

Last Updated:

हृदय मुद्रेमुळे रक्ताभिसरण सुधारतं, मज्जासंस्था शांत होते आणि हृदयाच्या समस्या कमी करण्यास मदत होते. हे आसन घरी सहजपणे करता येतं.

News18
News18
मुंबई : दिवसाची सुरुवात योगासनांनी केल्यानं पूर्ण दिवसभर त्याची ऊर्जा शारीरिक आणि मानसिक स्तरावर पोहचत राहते.
जीवनशैलीतल्या अनेक बदलांचा परिणाम प्रकृतीवर होतो. शारीरिक तसंच मानसिक पातळीवरही याचे परिणाम होतात. यातून बाहेर पडण्यासाठी, योगासनं नियमित केल्यानं शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवता येतं.
हृदय मुद्रा, ज्याला अनेक जण अपान वायु मुद्रा किंवा मृतसंजीवनी मुद्रा असंही म्हणतात. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेनं हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मानसिक ताकदीसाठी हृदय मुद्रा खूप प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. ही हातांची मुद्रा आहे. यामुळे, प्राण ऊर्जा हातातून हृदयाच्या क्षेत्राकडे वळवण्यास मदत होते. यामुळे हृदयाची शक्ती आणि ऊर्जा वाढते आणि हृदयाशी जोडलेल्या नसा सक्रिय होतात.
advertisement
हृदय मुद्रेचा नियमित सराव केल्यानं हृदयाला बळकटी मिळते आणि भावनिक ओझं कमी करायला मदत होते. ताणतणाव, मानसिक संघर्ष किंवा संकटाच्या वेळी ही मुद्रा खूप उपयुक्त आहे. यामुळे हृदय चक्र जागृत होतं, ज्यामुळे व्यक्तीमधे शांती, प्रेम आणि संतुलनाची भावना वाढते.
advertisement
हृदय मुद्रेमुळे रक्ताभिसरण सुधारतं, मज्जासंस्था शांत होते आणि हृदयाच्या समस्या कमी करण्यास मदत होते. हे आसन घरी सहजपणे करता येतं.
तज्ज्ञांच्या मते, सराव करण्यासाठी, सुखासन किंवा पद्मासन सारख्या आरामदायी स्थितीत बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, तळवे वरच्या दिशेनं ठेवा. तर्जनी वाकवा आणि ती तुमच्या अंगठ्याच्या तळाशी ठेवा. नंतर, मधल्या आणि अनामिका बोटांच्या टोकांना अंगठ्याला स्पर्श करा. करंगळी सरळ आणि सैल ठेवा.
advertisement
डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि हृदयाच्या भागावर लक्ष केंद्रित करा. दररोज दहा ते तीस मिनिटं या आसनाचा सराव करण्याचा सल्ला योग तज्ज्ञांनी दिला आहे.
हे आसन सोपं आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत आणि हे आसन सर्व वयोगटातील लोक करू शकतात. एखाद्याला हृदयविकाराचा गंभीर आजार असेल तर सुरुवात करण्यापूर्वी योग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hruday Mudra : शारीरिक, मानसिक ताणावर करा योगासनांनी मात, हृदय मुद्रा केल्यानं वाटेल शांत
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement