advertisement

22 वर्षीय तरुणीवर 3 रिक्षाचालकांचा सामूहिक अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवलीतून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. इथं एका २२ वर्षीय युवतीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
डोंबिवली: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवलीमधील टिळकनगर परिसरातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. इथं एका २२ वर्षीय युवतीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित तरुणीला पार्टी करण्याच्या बहाण्याने एका आरोपीच्या घरी नेलं होतं. इथं दारू पाजून पीडितेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आपल्यासोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेनं टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. टिळकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तिघेही रिक्षा चालक आहेत. यातील दोन आरोपींची पीडित तरुणीशी आधीपासून ओळख होती. घटनेच्या दिवशी, ओळखीचे दोन रिक्षा चालक पीडितेला पार्टीसाठी बाहेर घेऊन गेले होते. विश्वासामुळे पीडित तरुणी त्यांच्यासोबत गेली होती.
advertisement
पार्टीच्या बहाण्याने हे दोन्ही आरोपी तरुणीला तिसऱ्या साथीदाराच्या घरी घेऊन गेले. तिथे गेल्यावर मद्यपान करण्यात आले. तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर या तिन्ही रिक्षा चालकांनी मिळून पीडित तरुणीवर अमानुषपणे आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.

पोलिसांची तत्पर कारवाई

घडलेल्या प्रकारानंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
advertisement
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास टिळकनगर पोलीस करत आहेत. ओळखीचा फायदा घेऊन पार्टीच्या बहाण्याने एका तरुणीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
22 वर्षीय तरुणीवर 3 रिक्षाचालकांचा सामूहिक अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement