advertisement

Sunetra Pawar: पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर? सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे दोन बड्या नेत्यांची पाठ, राष्ट्रवादीत बंडाचे संकेत?

Last Updated:

Sunetra Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पाठ फिरवली. त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर? सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे दोन बड्या नेत्यांची पाठ,  राष्ट्रवादीत बंडाचे संकेत?
पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर? सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे दोन बड्या नेत्यांची पाठ, राष्ट्रवादीत बंडाचे संकेत?
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी लिहिलेलं पत्र समोर आलं. त्यामध्ये सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला नाही. पटेल, तटकरेंच्या पदाचा उल्लेख नसल्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत चर्चा सुरू असताना दिल्लीत आज आणखी एक घडामोड झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पाठ फिरवली. त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यात पक्षाचे दोन दिग्गज नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. साधारणपणे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांचा कोणताही दिल्ली दौरा असो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती अनिवार्य मानली जाते. पक्षाचे दिल्लीतील चेहरे म्हणून या दोन्ही नेत्यांचा राबता नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, यावेळी या दोन्ही नेत्यांनी फिरवलेली पाठ ही केवळ योगायोग आहे की पक्षातील अंतर्गत मतभेदांचे संकेत, यावर आता खल सुरू झाला आहे.
advertisement

सुनील तटकरे यांनी काय सांगितलं?

या अनुपस्थितीबाबत खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण सध्या आपल्या मतदारसंघात व्यस्त असल्याचे सांगितले. "मी सध्या मतदारसंघात आहे, जर दिल्लीत असतो तर नक्कीच भेटलो असतो," असे स्पष्टीकरण देत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
advertisement

राजकीय तर्कवितर्क

एकीकडे राज्यात 'ऑपरेशन टायगर' आणि पक्षांतराच्या चर्चा सुरू असताना, दिल्लीत सुनेत्रा पवारांच्या पाठिशी पक्षाचे मुख्य नेते सोबत न दिसणे हे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पक्षातील निर्णयांवरून काही नेते नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यातच ही अनुपस्थिती म्हणजे आगामी राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर? सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे दोन बड्या नेत्यांची पाठ, राष्ट्रवादीत बंडाचे संकेत?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement