समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं हनुमान मंदिर, बेटावर अकरावा मारुती, रामायणाशी आहे खास संबंध
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
महाराष्ट्रातील अकरा गावांमध्ये हनुमानाच्या मंदीरांची स्थापना केली. यापैकीच अकरावा मारुती सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये आहे. याठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी संबंधित आहे.
श्री महादेवाचा अकरावा अवतार मानला जाणारा हनुमान शक्तीचे प्रतीक म्हणून पुजला जोतो. सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी हनुमानाच्या पूजेच्या निमित्ताने लोकांमध्ये बलोपासनेची बीजे रुजावीत या हेतूने महाराष्ट्रातील अकरा गावांमध्ये हनुमानाच्या मंदीरांची स्थापना केली. यापैकीच अकरावा मारुती सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये आहे. याठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी संबंधित आहे.
advertisement
बहे गावामध्ये रामलिंग बेट वसलेले आहे. या बेटावर प्रभू रामाचे प्राचीन मंदिर आहे. तसूच श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. यासह अनेक छोटी मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या गाभऱ्यात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत यांच्या मूर्ती आहेत. तसेच मागील बाजूस समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. रामलिंग बेटावरील अकराव्या मारुती विषयी स्थानिक पुजारी श्रीराम बडवे यांनी पुरातन आख्यायिका सांगितली.
advertisement
advertisement
advertisement
हनुमंताने दोन बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे किंवा बाहे असे नाव या स्थानाला प्राप्त झाल्याचे मानले जाते. या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थांना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थांनी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली.
advertisement
advertisement
या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. असे आहे मारुतीचे वीररूप मारुतीचे दोन हात पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांड्यांच्या बाजूला धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती आहे. इथे जाण्यासाठी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर मात्र ही वाट पूर्ण बंद होते. त्यावेळी इथे जाता येत नाही.









