advertisement

पुणेकरांनो, त्या टोळीपासून सावधान! कार अडवून 4 जण समोर येतात अन् मग..; 'तो' भयंकर खेळ कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

जेव्हा दुचाकीस्वाराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तेव्हा चालकाने आपल्या कारमध्ये डॅश कॅम असल्याचे सांगितले. कॅमेरा असल्याचे कळताच, खंडणी उकळणाऱ्या भामट्यांनी तिथून काढता पाय घेतला.

कट मारून अपघाताचा बनाव मग उकळतात पैसे
कट मारून अपघाताचा बनाव मग उकळतात पैसे
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वाकड, हिंजवडी आणि डांगट पाटील नगर परिसरात सध्या वाहनचालकांना लुटण्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. चालत्या कारला जाणीवपूर्वक कट मारून अपघाताचा बनाव करायचा. त्यानंतर चालकावर दबाव टाकून पैसे उकळायचे, असा या टोळीचा प्रताप एका सजग नागरिकाच्या 'डॅश कॅम'मुळे उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काय आहे या टोळीची पद्धत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी प्रामुख्याने आलिशान आणि महागड्या कारला आपले लक्ष्य बनवते. टोळीतील तरुण दुचाकीवरून येतात आणि मुद्दाम कारला हलकासा कट मारतात किंवा गाडी घासून नेतात. गाडी थांबताच, "माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, माझा पाय मोडला आहे," असा आरडाओरडा सुरू केला जातो. काही वेळातच टोळीतील इतर साथीदार तिथे जमा होतात आणि कारचालकाला घेरून त्याच्यावर मानसिक दडपण आणतात. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत न नेण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी काही हजार रुपयांची मागणी केली जाते.
advertisement
डॅश कॅममुळे प्रकार उघड
नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, एका कारचालकाने ही फसवणूक वेळीच ओळखली. जेव्हा दुचाकीस्वाराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तेव्हा चालकाने आपल्या कारमध्ये डॅश कॅम असल्याचे सांगितले. कॅमेरा असल्याचे कळताच, खंडणी उकळणाऱ्या भामट्यांनी तिथून काढता पाय घेतला. डॅश कॅममधील फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दुचाकीस्वाराने स्वतःहून कारला कट मारला होता.
advertisement
वाकड पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयित टोळीचा शोध सुरू केला आहे. मात्र वाहनचालकांनी आपल्या वाहनात डॅश कॅम बसवा, जो संकटाच्या वेळी मोठा पुरावा ठरू शकतो. असा कोणताही संशयास्पद अपघात झाल्यास घाबरून त्वरित पैसे देऊ नका. तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करा किंवा समोरच्या व्यक्तीला पोलीस चौकीत सोबत येण्यास सांगा. भामटे सहसा पोलिसांचे नाव ऐकताच पळ काढतात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, त्या टोळीपासून सावधान! कार अडवून 4 जण समोर येतात अन् मग..; 'तो' भयंकर खेळ कॅमेऱ्यात कैद
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement