आज तुमची 'ही' एक चूक पडणार महागात, हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वी 'हे' काम कराच; 99% लोकं करतात चूक
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज देशभरात 'हनुमान जन्मोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चैत्र पौर्णिमेच्या या पावन पर्वावर प्रत्येक घरात आणि मंदिरात 'हनुमान चालीसा'चे सूर घुमत आहेत. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक परंपरेनुसार, 99% लोक हनुमान चालीसा पठण करताना एक मोठी चूक करतात, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
आज देशभरात 'हनुमान जन्मोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चैत्र पौर्णिमेच्या या पावन पर्वावर प्रत्येक घरात आणि मंदिरात 'हनुमान चालीसा'चे सूर घुमत आहेत. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक परंपरेनुसार, 99% लोक हनुमान चालीसा पठण करताना एक मोठी चूक करतात, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
advertisement
हनुमान जन्मोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व: हनुमान हे शिवजींचे अकरावे रुद्र अवतार मानले जातात. त्रेतायुगात प्रभू श्रीरामांना रावणावर विजय मिळवून देण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांचा जन्म झाला. हनुमान हे 'चिरंजीव' आहेत, याचा अर्थ ते आजही पृथ्वीवर सूक्ष्म रूपात अस्तित्वात असून भक्तांच्या हाकेला धावून येतात.
advertisement
हनुमान चालीसा पठणापूर्वीची 'ती' चूक: बहुतेक लोक थेट हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करतात. मात्र, हनुमानजींचा स्वभाव हा 'रामदूत' असा आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या स्वामींचे म्हणजेच प्रभू श्रीरामांचे स्मरण करत नाही, तोपर्यंत हनुमानजी तुमची सेवा पूर्णपणे स्वीकारत नाहीत. म्हणूनच चालीसा वाचण्यापूर्वी किमान एकदा 'रामरक्षा स्तोत्र' किंवा 108 वेळा 'श्री राम' नामाचा जप करणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
कथा: हनुमानाची भक्ती आणि शक्ती: पौराणिक कथेनुसार, जेव्हा हनुमानजी सूर्याला फळ समजून गिळायला गेले होते, तेव्हा इंद्राच्या वज्रप्रहाराने ते मूर्च्छित झाले. त्यानंतर सर्व देवांनी त्यांना वरदान दिले. मात्र, त्यांची खरी शक्ती तेव्हाच जागृत झाली जेव्हा त्यांनी श्रीरामांची सेवा स्वीकारली. म्हणूनच 'राम' आणि 'हनुमान' हे समीकरण अविभाज्य आहे.
advertisement
अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी उपाय: जर तुमची कामे वारंवार अडकत असतील, तर आज हनुमान जयंतीला लाल वस्त्र परिधान करून, समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. आधी रामरक्षा स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचे 11 वेळा पठण करा. यामुळे कुंडलीतील शनी आणि मंगळ दोष दूर होऊन नशिबाची साथ लाभेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










