advertisement

१५ लाखांची चोरी करून गटारात लपले चोर; झाकण उघडताच अधिकारीही हैराण, नवी मुंबईत पहाटे अजब थरार!

Last Updated:

संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी परिसरातील गटार उघडून पाहिले असता, आतमध्ये दोन तरुण वायर कापताना रंगेहाथ आढळले.

गटारात लपून १५ लाखांची कॉपर वायर चोरणाऱ्यांना रंगेहाथ बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
गटारात लपून १५ लाखांची कॉपर वायर चोरणाऱ्यांना रंगेहाथ बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
नवी मुंबई : नवी मुंबईत फिल्मी स्टाईल चोरीचा एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एमटीएनएलला पुन्हा एकदा चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नेरूळ सेक्टर १६ मध्ये कॉपर वायर चोरण्यासाठी थेट गटारात उतरलेल्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या चोरीमुळे एमटीएनएलचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, दूरसंचार सेवेवरही याचा परिणाम झाला आहे.
गटार उघडले आणि चोरटे समोर
बुधवारी (१ एप्रिल) पहाटे नेरूळ सेक्टर १६ येथील पूनम टॉवर परिसरात अचानक एमटीएनएलच्या वायर कापल्या गेल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तांत्रिक बिघाड नसून चोरी असावी, असा संशय आल्याने उपव्यवस्थापक प्रदीपकुमार विश्वकर्मा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी परिसरातील गटार उघडून पाहिले असता, आतमध्ये दोन तरुण वायर कापताना रंगेहाथ आढळले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सलमान खान (वय २५) आणि अब्दुल खान (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी असून, त्यांनी तब्बल ५६० मीटर लांबीची कॉपर वायर कापली होती. या वायरची किंमत बाजारभावाप्रमाणे १५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. महागड्या कॉपर वायरला बाजारात मोठी मागणी असल्याने, या टोळ्या जीव धोक्यात घालून जमिनीखालील आणि गटारांमधील वायर्स चोरतात. नेरूळ पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
advertisement
या घटनेमुळे नेरूळ परिसरातील टेलिफोन आणि इंटरनेट सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. अशा चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
१५ लाखांची चोरी करून गटारात लपले चोर; झाकण उघडताच अधिकारीही हैराण, नवी मुंबईत पहाटे अजब थरार!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement