advertisement

IPL सुरू असताना तुफान राडा, स्टेडियममध्ये WWF चा रंगला थरार, VIDEO

Last Updated:

सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेले चाहते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. क्रिकेटचं मैदान आहे की WWE चं मैदान असा सवाल युजर्सनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केला आहे.

क्रिकेटच्या मैदानात राडा
क्रिकेटच्या मैदानात राडा
आयपीएलच्या सामन्यांची रणधुमाळी सुरू आहे. २०२६ च्या पाचव्या सामन्यात स्टेडियममध्ये WWF चा थरार पाहायला मिळाला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर काही वेळ तणावाचं वातावरण होतं. लखनऊ सुपरजाएन्ट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यादरम्यान स्टेडियमच्या एका स्टँडमध्ये चाहत्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या समोरच चाहत्यांनी एकमेकांवर लात-बुक्क्यांनी मारहाण केली.
स्टेडियम खचाखच भरलेलं असताना अचानक एका कोपऱ्यात राडा सुरू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेले चाहते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. क्रिकेटचं मैदान आहे की WWE चं मैदान असा सवाल युजर्सनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केला आहे.
advertisement
मैदानावरील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावांचा टप्पा गाठला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनऊला जखडून ठेवलं. टी. नटराजन आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत लखनऊचं कंबरडं मोडलं. तर कुलदीप यादवने २ आणि कर्णधार अक्षर पटेलने १ विकेट घेत मोलाची साथ दिली.
advertisement
१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या २६ धावांत ४ गडी बाद झाल्यामुळे दिल्ली पराभवाच्या छायेत होती. मात्र, त्यानंतर युवा स्टार समीर रिझवीने डावाची सूत्रं हाती घेतली. रिझवीने नाबाद ७० धावांची तुफानी खेळी केली, तर त्याला ट्रिस्टन स्टब्सने उत्तम साथ दिली. या जोडीने दिल्लीला ६ गडी राखून पहिला विजय मिळवून दिला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL सुरू असताना तुफान राडा, स्टेडियममध्ये WWF चा रंगला थरार, VIDEO
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement