advertisement

रात्रीच्या अंधारात फुरसुंगीत दारूच्या नशेत आली 4 अल्पवयीन मुलं; हातात धारदार शस्त्रं अन् ते कांड, रहिवासी भयभीत

Last Updated:

फुरसुंगी येथील क्रांती मित्र मंडळ परिसरात मंगळवारी (३१ मार्च) रात्री मद्याच्या नशेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांनी तीक्ष्ण शस्त्रांसह दहशत माजवली

फुरसुंगीत अल्पवयीन मुलांचं कांड (प्रतिकात्मक फोटो)
फुरसुंगीत अल्पवयीन मुलांचं कांड (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्याच्या उपनगरांमध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. यात फुरसुंगी येथील क्रांती मित्र मंडळ परिसरात मंगळवारी (३१ मार्च) रात्री मद्याच्या नशेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांनी तीक्ष्ण शस्त्रांसह दहशत माजवली. या मुलांनी रस्त्यावर पार्क केलेली रिक्षा, टेम्पो आणि दुचाकी अशा एकूण नऊ वाहनांची तोडफोड केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हे चारही अल्पवयीन परिसरात आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखी तीक्ष्ण शस्त्रे होती. मद्याच्या नशेत असलेल्या या मुलांनी आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी समोर येतील त्या वाहनांवर प्रहार केले.
वाहनांचे मोठे नुकसान
या तोडफोडीमध्ये ३ रिक्षा, २ टेम्पो आणि ४ दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आणि परिसरात पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्यांपैकी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत.
advertisement
शहरात अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रात्रीच्या अंधारात फुरसुंगीत दारूच्या नशेत आली 4 अल्पवयीन मुलं; हातात धारदार शस्त्रं अन् ते कांड, रहिवासी भयभीत
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement